नाशिक

पूर्व विभागीय कार्यालयात पावसाळी आपत्कालीन कक्ष

CD
फोटो : A13984 नाशिक : पूर्व विभागीय कार्यालयातील आपत्कालीन कक्ष -- पूर्व विभागीय कार्यालयात आपत्कालीन कक्ष २४ तास कार्यरत; वेगवेगळ्या सत्रांमध्ये कर्मचाऱ्यांची नियुक्ती सकाळ वृत्तसेवा जुने नाशिक, ता. २४ : पावसाळ्यात उद्भवणाऱ्या आपत्कालीन परिस्थितीवर तातडीने उपाययोजना करण्यासाठी आणि नागरिकांना वेळेत मदत मिळवून देण्यासाठी महापालिकेकडून विभागीय कार्यालयांमध्ये आपत्कालीन कक्ष सुरू करण्यात येत आहेत. याच नियोजनाचा भाग म्हणून पूर्व विभागीय कार्यालयात २४ तास कार्यरत असणारा आपत्कालीन कक्ष कार्यान्वित करण्यात आला आहे. चालू पावसाळ्यात जून महिना संपत आला तरी शहरात अद्याप नियमित पाऊस सुरू झालेली नाही. संपूर्ण जून महिन्यात केवळ दोनच वेळा पाऊस झाला आहे. असे असले तरी आगामी दिवसांत मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली जात असल्याने, महापालिका मुख्यालयाने सर्व विभागीय कार्यालयांना सज्जतेचे आदेश दिले आहेत. त्यानुसार पूर्व विभागीय कार्यालयातील तक्रार निवारण कक्षातच या आपत्कालीन कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. येथे वेगवेगळ्या सत्रांमध्ये (शिफ्ट) कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली असून त्यांचे वेळापत्रकही जाहीर करण्यात आले आहे. हा कक्ष २४ तास सुरू राहणार असल्याने मुसळधार पाऊस किंवा इतर आपत्तीच्या वेळी नागरिक येथे थेट संपर्क साधून मदत मागू शकतात. सध्या समाधानकारक पाऊस झाला नसल्याने या कक्षाकडे अद्याप कोणतीही तक्रार आलेली नाही; तरीही सुरक्षेचा उपाय म्हणून कर्मचारी तेथे तैनात ठेवण्यात आले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Rain Alert : राज्यात आज जोरदार पावसाची शक्यता, अनेक जिल्ह्यांत येलो अलर्ट जारी; तुमच्या भागात कसे असेल हवामान? जाणून घ्या

Maratha Reservation: समाजापासून मला दूर ठेवण्याचा सरकारचा कट; माढ्यातील इशारा सभेत मनोज जरांगे यांचा आरोप, आरक्षणाचा लढा सुरूच राहणार

अर्थभान : इमर्जिंग अर्थव्यवस्थांमध्ये भारत अव्वल

शाळांना यंदा ११ दिवस दिवाळी सुट्टी! शैक्षणिक वर्षात २३७ दिवस अध्यापनाचे अन्‌ शिक्षकांना १२८ दिवस सुट्ट्या; यंदा वार्षिक परीक्षा एप्रिलअखेर, वाचा...

Jharkhand Protest: झारखंडमध्ये भरती परीक्षांवरून आंदोलन पेटले; विद्यार्थी संघटना सीबीआय चौकशीच्या मागणीवर ठाम

SCROLL FOR NEXT