नाशिक

पैशांच्या मागणीसाठी विवाहितेचा छळ

CD
पैशांसाठी विवाहितेचा छळ जुने नाशिक, ता. २५ : घर घेण्यासाठी पैशाची मागणी पूर्ण केली नसल्याने विवाहितेचा मानसिक शारीरिक छळ करत घराबाहेर काढल्याची घटना घहली. याबाबत भद्रकाली पोलीस ठाण्यात पीडित विवाहितेच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला. फिर्यादी महिलेचा २०१२ मध्ये शरद रोहम याच्याशी विवाह झाला होता. विवाहानंतर दोघांनी शहरात वास्तव्य केले. पुढे घर खरेदी, संसार खर्च तसेच इतर कारणांसाठी तिने पतीला आर्थिक मदत केली. दरम्यान, सासरच्या मंडळींनी संगमनेर येथे घर बांधण्यासाठी पैशांची मागणी केली. पैसे देण्यास नकार दिल्यानंतर पती शरद आनंदराव रोहम, सासरे आनंदाराव रोहम, सासू लक्ष्मीबाई रोहम, नणंद पुष्पा पवार यांनी वारंवार शिवीगाळ, मारहाण करून मानसिक आणि शारीरिक छळ केल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. जून २०२४ मध्ये तिला घराबाहेर काढण्यात आले. त्यानंतर सासरी परत नेण्यात आले नसल्याचा आरोपही करण्यात आला. यापूर्वी महिला सुरक्षा विभागाकडे तक्रार केल्यानंतरही समेट न झाल्याने महिलेने भद्रकाली पोलीस ठाण्यात त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Explained: 500 च्या जळलेल्या नोटा कुणाच्या होत्या? Justice Yashwant Varma Cash कांडाची पूर्ण Timeline

Mumbai High Court Order : जयगड बंदरातील आमिराती गॅसवाहू जहाजाबाबत हायकोर्टाचा मोठा निर्णय; साडेनऊ कोटी भरा, नाहीतर गॅस रिकामा करा!

Pune Tunnel: पुण्यात आणखी एक बोगदा! सुतारदरा ते पाषाण भुयारी मार्गासाठी लवकरच सल्लागार नियुक्त, महापालिकेचा मोठा प्लॅन

Latest Marathi News Live Update : पुण्यात वारजे कर्वेनगर भागात पडलेल्या प्रचंड खड्डे दुरुस्ती साठी मनसे तर्फे वारजे क्षेत्रीय प्रमुखांना तुकाराम मुंडे यांची प्रतिमा भेट

Gokul Election Update : 'गोकुळ'ची बहुचर्चित प्रारूप मतदार यादी जाहीर; 4,897 संस्थांना मतदानाचा हक्क, 'इतक्या' संस्थांना बसला फटका!

SCROLL FOR NEXT