फोटो : A13994
नाशिक : प्रसिद्ध ताजियाचे दर्शन घेताना भाविक
--
मुस्लिम बांधवांचा आशूरा सण उत्साहात
ताजिया, सवारीचे विधीवत विसर्जन
सकाळ वृत्तसेवा
जुने नाशिक, ता. २६ : हजरत इमाम हुसैन यांच्या पवित्र स्मृतिप्रीत्यर्थ शुक्रवारी (ता.२६) विविध धार्मिक कार्यक्रमांनी आशूरा सण साजरा करण्यात आला. पारंपारिक हलोका ताजियासह विविध ठिकाणी स्थापना केलेल्या ताजिया आणि सवारीचे विधीवत विसर्जन करण्यात आले.
पवित्र मोहरम पर्वाच्या दहाव्या दिवशी आशूराचा सण साजरा करण्यात येतो. शुक्रवारी आशुराची विशेष नमाजपठण करण्यात आली त्यानंतर दुवा-ए-आशुराचे पठण झाले. काही मुस्लिम बांधवांकडून रोजा करण्यात आला. घरोघरी खिचडा, नियाजे हुसैन आणि सरबत तयार करून फातेहा पठण करण्यात आले. प्रसाद म्हणून त्याचे वाटप करण्यात आले. दरम्यान परंपरा म्हणून मुस्लिम कुटुंबीयांकडून ताजिया, सवारीची स्थापना केली होती. त्या ताजिया आणि सावरीचे विसर्जन करण्यात आले. आशुराच्या दिवशी गहू आणि विविध डाळीपासून खिचडा तयार करण्याची परंपरा आहे. त्याचप्रमाणे सरबतदेखील तयार केले जाते. बहुतांशी मुस्लिम कुटुंबीयांच्या घरी वर्षातून एकच वेळा अर्थात मोहरम पर्वात खिचडा तयार करण्यात येत असतो. त्यानिमित्ताने मुस्लिम बांधवांमध्ये विशेष आकर्षण असते.
मोहरम पर्वात ताजिया स्थापन करण्याची काहींची परंपरा आहे. सारडा सर्कल येथील इमाम शाही दर्गा परिसरात दर वर्षी हलोका ताजियाची स्थापना केली जाते. सारडा सर्कल परिसरातून ताजियाची मिरवणूक काढून सायंकाळी विधीवत विसर्जन करण्यात आले. तत्पूर्वी भाविक विशेषत महिला भाविकांकडून ताजियाचे दर्शन घेऊन नवसपूर्ती करण्यात आली. हलको के ताजियाची विशेषता म्हणजे आदिवासी कोळी बांधवांना खांदेकरीचा मान आहे.
..............
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.