नाशिक

ऑनलाईन बेटिंग सेंटरवर सायबर पोलिसांचा छापा, आंतरराज्यीय टोळीतील पाच जण अटकेत

CD
फोटो : A13996 नाशिक : ऑनलाइन बेटिंग सेंटर चालविणाऱ्या टोळीकडून जप्त केलेला मुद्देमाल -- ऑनलाइन बेटिंग सेंटरवर छापा पाच जणांची टोळी अटकेत; सायबर पोलिसांची कारवाई सकाळ वृत्तसेवा नाशिक, ता. २६ : शहर सायबर पोलिसांनी ऑनलाइन बेटिंग सेंटर चालविणाऱ्या आंतरराज्यीय टोळीचा पर्दाफाश करून पाच जणांना अटक केली आहे. कारवाईदरम्यान चार लॅपटॉप, १८ मोबाईल, तीन राऊटर, ५४ बँक पासबुक, चार चेकबुक, २५ एटीएम कार्ड, २६ सिमकार्ड, पैशांच्या व्यवहाराची नोटबुके आणि इतर साहित्य असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. अंमलदार भूषण देशमुख आणि दर्शन सोनवणे यांना देवळाली परिसरात अरबाज शब्बीर शेख ऑनलाइन बेटिंग सेंटर चालवत असल्याची माहिती मिळाली. त्याच्या चौकशीदरम्यान मिळालेल्या माहितीनुसार गंगा निवास, कळवण रोड, नाशिक येथे छापा टाकण्यात आला. कारवाईत अरबाज शब्बीर शेख (२७, रा. वडनेर दुमाला, देवळाली), आसिफ जाफर हुसेन (४२, रा. लासलगाव), पठाण अरबाज खान फरीद खान (२३, रा. गुजरात), पंकज नामदेव आहेर (३४, रा. वडनेर गेट पाथर्डी रोड) आणि सागर रमेश कांबळे (३८, रा. कोल्हापूर) यांना ताब्यात घेण्यात आले. संशयित विविध वेबसाइटच्या माध्यमातून ग्राहकांकडून ऑनलाइन डिपॉझिट आणि विड्रॉवल करून बेटिंगचा व्यवसाय चालवत असल्याचे तपासात निष्पन्न झाले. याप्रकरणी सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, उपायुक्त (गुन्हे) किरणकुमार चव्हाण आणि सहायक आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ निरीक्षक संजय पिसे, सहायक निरीक्षक धिरज गवारे, अंमलदार साहिल सय्यद, दर्शन सोनवणे, भूषण देशमुख, गिरीश ठाकूर, कल्पेश पाटील आणि विकास पाटील यांच्या पथकाने कारवाई केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs IRE 1st T20I: लिंबू टिंबू समजणाऱ्या आयर्लंडने इंगा दाखवला; भारतीय गोलंदाजांना झोडले... अय्यरच्या टीमसमोर तगडे लक्ष्य ठेवले

MPSC Prelims Reform: एमपीएससी पूर्व परीक्षा वर्षातून दोन किंवा अधिक वेळा; विद्यार्थ्यांचा ताण कमी करण्यासाठी २०२७ पासून नवी पद्धत लागू

Pune University QS ranking drop: राजकीय हस्तक्षेपामुळे पुणे विद्यापीठाच्या क्यूएस मानांकनात मोठी घसरण; युवक काँग्रेसचा सरकारवर आरोप

विजय वडेट्टीवार काँग्रेस सोडणार? उदय सामंत यांच्या विधानावर नेमकं काय म्हणाले? वाचा...

Mumbai: मळमळ होते सांगून टॅक्सी थांबवली; नंतर प्रसिद्ध व्यावसायिकाने सी-लिंकवरून उडी घेतली, कारण काय?

SCROLL FOR NEXT