गुजरातमधून विक्रीस आलेला
अडीच लाखाचा गुटखा जप्त
सकाळ वृत्तसेवा
जुने नाशिक, ता. ३१ : गुजरातहून शहरात विक्रीस आलेला प्रतिबंधक गुटखा गुन्हे शाखेच्या युनिट एकच्या पथकाने ट्रॅक्टर हाऊस परिसरात छापा मारून जप्त केला व दोघा संशयितांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून २ लाख ६५ हजार ४२२ रुपयांचा गुटखा, तसेच १४ लाख ३० हजारांचे दोन वाहने, दोन मोबाईल असा १७ लाख ३० हजार ४२२ रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.
हवालदार मिलिंदसिंग परदेशी आणि संदिप भांड यांना पांढऱ्या रंगाच्या चारचाकीतून (एमएच- १९- एई- २८०४) गुजरातहून गुटखा आणला जाणार असल्याची माहिती मिळाली. वरिष्ठ पोलिस निरीक्षक आंचल मुदगल यांच्या मार्गदर्शनात उपनिरीक्षक रमीज शेख, चेतन श्रीवंत, दत्तात्रेय पोटे, हवालदार परदेशी, भांड, विशाल काठे, मुशरीफ शेख, प्रशांत मरकड, नाझीमखान पठाण, अंमलदार मुक्तार शेख, गोरक्ष साबळे, समाधान पवार, राम बर्डे यांच्यासह अन्न सुरक्षा अधिकारी गोविंदा गायकवाड यांनी ट्रॅक्टर हाउसजवळ सापळा रचून पकडले. चालक असीम शफीक पठाण (२८, रा. शिवाजीवाडी, भारतनगर) याची चौकशीत वाहनात गुटखा असल्याचे सांगितले. त्याने काही अंतरावर उभ्या दुसऱ्या वाहनाचीही माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी दुसरी चारचाकी (एमएस- १७- एजे- ००७०) ताब्यात घेतली. चालक दानिश उस्मान सय्यद (३०, रा. भारतनगर) याच्याकडे चौकशी केली. त्याच्याही वाहनात गुटखा असल्याचे आढळले. संशयितांच्या चौकशीत गुटखा सुतारपाडा, नाना पोंडा व वापी (गुजरात) येथील कमलेश माळी, धीरज माळी, किशोर माळी, सुनील चौधरी, उमेश चौधरी, कांजीभाई पटेल व मिश्रा या व्यापाऱ्यांकडून आणल्याची माहिती समोर आली. शहरात रफीक सैय्यद, इरफान मणियार व विकार उर्फ बाबू शेख यांच्यासोबत भागीदारीत गुटख्याचा व्यवसाय करीत असल्याची माहितीही संशयितांनी दिली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.