पान दोन
14626, 14625
नाशिक : प्रभाग सभेत नागरी समस्या मांडताना नगरसेविका संध्या कुलकर्णी. दुसऱ्या छायाचित्रात मोकाट कुत्र्यांची दहशत दाखविणारा व्हिडिओ मोबाईल मध्ये नगरसेविका आशा तडवी.
ठेकेदारास मुदतवाढ देण्यास सदस्यांचा विरोध
कामे होत नसल्याने पूर्व विभाग प्रभागाच्या बैठकीत निर्णय
सकाळ वृत्तसेवा
जुने नाशिक, ता.१ : मलेरिया विभागाचे काम करणाऱ्या ठेकेदाराची मुदत सोमवार (ता.३१) रोजी संपली. अद्याप दुसरे ठेकेदाराबाबत कुठल्या प्रकारचा निर्णय झालेला नाही. असे असताना सध्याच्या ठेकेदाराचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे आहे. वेळेत कामे केली जात नाही. ठेकेदाराकडून अरेरावी केली जाते. त्यामुळे या ठेकेदारास मुदतवाढ देऊ नये. असा ठराव प्रभाग सभेत करण्यात यावा, अशी मागणी नगरसेवक सचिन मराठे सह इतर नगरसेवकांनी केली. तसेच विविध प्रकारच्या नागरी समस्यांबाबत कामे होत नसल्याची खंत सर्वच नगरसेवकांनी व्यक्त केली.
सभापती मंगला नन्नावरे यांच्या अध्यक्षतेत पूर्व विभागाची प्रभाग सभा सोमवारी झाली. विषय पत्रिकेवर केवळ दोन विषय होते. त्यांच्यासह जादा विषयांना मंजुरी देण्यात आली. यावेळी विविध नागरिक समस्यांबाबत जोरदार चर्चा झाली. सर्वच प्रभागांमध्ये डास मच्छरांच्या प्रमाणात प्रचंड वाढ झाली आहे. डेंगी आणि स्वाईन फ्लू सारखे रुग्ण वाढत आहे. मलेरिया विभागाकडून योग्य प्रमाणात औषध आणि धूर फवारणी होत नाही. औषधही कुठल्या प्रकारचे फवारणी करतात कळत नाही. या प्रकरणी चर्चा सुरू असताना मलेरिया विभागाच्या ठेकेदाराची मुदत सोमवारी संपत असल्याची माहिती समोर आली. ठेकेदारास मुदतवाढ द्यायची की नाही अद्याप निश्चित झालेले नाही. यावर मराठे आणि इतर नगरसेवकांनी आक्रमक भूमिका घेत ठेकेदार मुदतवाढ देण्यात येऊ नये. सभेत तसा ठराव करण्यात यावा. महापालिका आयुक्तांना देखील याबाबत पत्र देणार असल्याचे सचिन मराठे यांच्याकडून सांगण्यात आले.
त्याचप्रमाणे मोकाट कुत्र्यांचा प्रभागांमध्ये मोठा वावर वाढला आहे. नागरिकांवर हल्ला करण्याचे प्रमाण वाढले आहे. याबाबत नगरसेविका आशा तडवी यांनी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यास जाब विचारला. मोकाट कुत्र्यांसंदर्भात काय कारवाई केली जात आहे. याची माहिती मागितली. याबाबत त्यांनी मोकाट कुत्र्यांचा व्हिडिओ प्रभाग सभेत दाखवत कारवाईची मागणी केली.
---------
माहिती देण्यास टाळाटाळ
नगरसेविका सामिया खान यांनी प्रभाग १४ मध्ये ड्रेनेज, पाणीपुरवठा, औषध फवारणी अशा विविध प्रकारच्या समस्या असूनही संबंधित विभागाचे अधिकारी त्या सोडविण्याचा प्रयत्न करत नाही. कुठली कामे केली जात आहे याबाबत माहिती देखील अधिकाऱ्यांकडून दिली जात नाही, असा आरोप केला. सारडा सर्कल ते मुंबई नाका मार्गावरील अतिक्रमणाबाबत वारंवार तक्रारी करूनही मोहीम का राबविली जात नाही. याबाबत नाराजी व्यक्त केली. त्वरित अतिक्रमण मोहीम राबवून नागरी समस्या सोडवाव्यात अशी मागणी त्यांनी केली. जागृती गांगुर्डे आणि नाझिया अत्तर यांनीही प्रभागातील समस्या सोडवाव्यात अशी मागणी केली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.