मेनला जोड
--
फोटो : H28767
जिल्हा रुग्णालयाला छावणीचे स्वरूप
जुने नाशिक : सृष्टी सूर्यवंशी या विद्यार्थिनीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी शुक्रवारी (ता. ४) सकाळी दहाच्या सुमारास जिल्हा शासकीय रुग्णालयात आणण्यात आला. या वेळी रुग्णालय आवारात काहीसा तणाव निर्माण झाला होता. पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्यासह शहर ग्रामीण पोलीस फौज फाटा रुग्णालयात दाखल झाल्याने रुग्णालयास पोलिस छावणीचे स्वरूप प्राप्त झाले. पोलिस उपायुक्त मोनिका राऊत तसेच सर्व ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक आणि शीघ्रकृतिदल, निर्भया पथक यांच्यासह ग्रामीण पथक रुग्णालय आवारात दाखल झाल्याने दाखल झाले. दोषींवर कारवाई करण्याची मागणी उपस्थितांकडून करण्यात आली. तणाव वाढत असल्याने आदिवासी विकास आयुक्त लीना बनसोड, अप्पर आदिवासी विकास आयुक्त दिनकर पावरा यांच्यासह अन्य अधिकारी यांच्यासह पोलीस आयुक्त कर्णिक यांनी बैठक घेऊन याबाबत तातडीने निर्णय घ्यायला लावला. सायंकाळी सुमारे सहा वाजेच्या दरम्यान सर्व शासकीय पूर्तता करून जिल्हा रुग्णालयातून मृतदेह कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आला. घडलेल्या घटनेने संपूर्ण शहर जिल्ह्याचे वातावरण ढवळून निघाले आहे.
--कोट
सृष्टीची तब्येत जास्त खालावल्यानंतर आश्रमशाळेतून माहिती देण्यात आली. तिच्या मृत्यूसंदर्भात संशय आहे. त्यामुळे संपूर्ण प्रकाराची चौकशी व्हावी.
- ओंकार सूर्यवंशी, मृत सृष्टीचे वडील
..............
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.