नाशिक

द्वारका ते काठे गल्ली सिग्नल पूना रोड वाहतुकीसाठी खुला झाल्याने वाहनचालकांना दिलासा

CD
सेकंड मेन -- फोटो : A14666, A14667 नाशिक : द्वारका ते नाशिक रोड पुणेमार्गे हलक्या वाहनांसाठी खुला करताच सुरू झालेली वाहतूक --- द्वारका- काठे गल्ली रस्ता हलक्या वाहनांसाठी खुला नाशिक रोड, पुणे महामार्गावरील वाहतूक कोंडीतून मोठा दिलासा सकाळ वृत्तसेवा जुने नाशिक, ता. ६ : द्वारका ते काठे गल्ली सिग्नलदरम्यानचा पुणे रोड रविवारी (ता. ६) सकाळपासून हलक्या वाहनांच्या वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे. यामुळे पुणे आणि नाशिक रोडच्या दिशेने जाणाऱ्या वाहनचालकांना दिलासा मिळाला आहे. सध्या या मार्गावरून केवळ हलकी वाहने सोडली जात असून, येत्या काही महिन्यांत सर्व प्रकारच्या वाहनांची वाहतूक यावरून पूर्ववत व सुरळीत केली जाणार आहे. सुमारे आठ दिवसांपूर्वीच मुंबई ते धुळे मार्ग वाहतुकीसाठी खुला केला होता. मात्र, तरीही वाहतूक कोंडीची समस्या कायम होती. या पार्श्वभूमीवर रविवारी सकाळी द्वारका हॉटेलला लागून असलेला द्वारका ते काठे गल्ली सिग्नल असा पुणे मार्ग हलक्या वाहनांसाठी खुला करण्यात आला. नाशिक रोडकडून शालिमारकडे जाणारा एक मार्ग आधीपासूनच सुरू होता. आता द्वारकेकडून नाशिक रोडकडे जाणारा मार्गही सुरू झाल्याने द्वारका चौकासह परिसरातील विविध भागांतील वाहतूक कोंडी सुटण्यास मोठी मदत होणार आहे. हा मार्ग सुरू झाल्याने काठे गल्लीतील रहिवाशांसह नाशिक रोडच्या दिशेने प्रवास करणाऱ्या नागरिकांना आणि वाहनधारकांना दिलासा मिळाला आहे. यामुळे पर्यायी मार्गांवरील वाहनांची गर्दी कमी होण्यास मदत होणार असून, वडाळा नाका, द्वारका चौक तसेच ट्रॅक्टर हाऊस चौकातील वाहतुकीचा ताण मोठ्या प्रमाणात हलका होणार आहे. दरम्यान, सिटी लिंक बससाठीही हा मार्ग खुला करण्यात आला आहे. सध्या नाशिक रोडकडे जाणारी बस वडाळा रोडने वळताना वडाळा नाका चौकात मोठी कोंडी होते. त्यामुळे ही बस वडाळा रोडऐवजी नव्याने सुरू झालेल्या द्वारका ते नाशिक रोड मार्गाने वळवल्यास वाहतूक कोंडी कायमस्वरूपी सुटण्यास मदत होईल, असा सूर उमटत आहे. ---चौकट पर्यायी मार्गांवरील कोंडी फुटणार पुणे महामार्ग वाहतुकीसाठी बंद असल्याने नाशिक रोडकडे जाणारी वाहतूक वडाळा रोड, नागजी सिग्नल ते काठे गल्ली आणि भाभानगर ते काठे गल्ली सिग्नलमार्गे वळवण्यात आली होती. तर शहरात येणारी वाहतूक अशोकामार्गे वडाळा रोडने सुरू होती. यामुळे या सर्व पर्यायी मार्गांवर प्रचंड वाहतूक कोंडी होत होती. आता थेट द्वारका ते नाशिक रोड मार्ग हलक्या वाहनांसाठी सुरू झाल्याने या पर्यायी रस्त्यांवरील ताण कमी होणार असून, ट्रॅक्टर हाऊस चौकातील कोंडीतून नागरिक व वाहनधारकांची मुक्तता होणार आहे. -- चौकट सारडा सर्कल मार्ग सुरू होण्याची प्रतीक्षा द्वारका ते नाशिक रोड मार्ग सुरू झाल्यानंतर आता द्वारका चौकीला लागून असलेला द्वारका ते सारडा सर्कल मार्गही हलक्या वाहनांसाठी लवकरात लवकर खुला करावा, अशी मागणी केली जात आहे. हा मार्ग सुरू झाल्यास द्वारका चौक आणि वडाळा नाक्यावरील वाहतूक कोंडीची समस्या कायमस्वरूपी सुटेल, तसेच भुयारी मार्गाच्या कामातही कोणतीही अडचण येणार नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Finance Manager Murder Case : ६ लाखांच्या कर्जासाठी फायनान्स मॅनेजरची हत्या; प्रेमी युगुलाचा धक्कादायक कट

Parent Care: खानगावमध्ये मातृ-पितृ सेवेला सलाम; दशक्रिया विधीत विजय बोंबले दांपत्याचा ‘उत्कृष्ट मातृ पितृ सेवा पुरस्कार’ देऊन गौरव

Duleep Trophy Final : इशान किशनचे दहावे शतक! मोहम्मद सिराजसह सर्व गोलंदाजांना चोप दिला, ४०० पारच्या दिशेने वाटचाल Video

Marathi News Live Updates : पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात

नवरा असावा तर असा! 'स्वतः भांडी घासतात, किचनही साफ करतात'; पतीबद्दल बोलताना श्रेया घोषाल म्हणाली...'त्यांनी मला कधीच...'

SCROLL FOR NEXT