नाशिक

चाकूचा धाक दाखवत ब्रोकरकडून २ लाख २० हजारांची खंडणी वसूल

CD
चाकूचा धाक दाखवत २ लाख २० हजारांची खंडणी वसूल सकाळ वृत्तसेवा जुने नाशिक, ता. ७ : चाकूचा धाक दाखवून जिवे मारण्याची धमकी देत एका व्यक्तीकडून सुमारे २ लाख २० हजारांची खंडणी उकळल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी भद्रकाली पोलिस ठाण्यात सद्दाम बाबु शेख याच्यासह त्याच्या दोन साथीदारांविरुद्ध ‘मामु’ नामक व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पंचवटी अमृतधाम येथील गणेश महेश झाल्टे यांच्याकडून सप्टेंबर २०२४ च्या दुसऱ्या आठवड्यापासून ऑगस्ट २०२६ च्या पहिल्या आठवड्यापर्यंत ट्रॅक्टर हाऊस आणि खडकाळी सिग्नल परिसरात घटना घडल्याचे तक्रारीत नमूद केले आहे. तक्रारदार कामानिमित्त ट्रॅक्टर हाऊस येथून रामतीर्थकडे जात असताना संशयितांनी त्यांची गाडी अडवली. चाकूचा धाक दाखवत त्यांच्या टोळीला दरमहा २० हजारांचा हप्ता द्यावा लागेल, अन्यथा जिवे मारण्याची धमकी दिली. त्यानंतर त्यांच्याकडून १ लाख २० हजार रुपये हप्ता वसूल करण्यात आला. तसेच त्यांना सुमारे दोन तास जबरदस्तीने थांबवून ठेवण्यात आले. यानंतर ‘मामु’ नामक व्यक्तीमार्फत २२ डिसेंबर २००३ रोजीचे साठेखत मागवून घेण्यात आले. चाकूचा धाक दाखवत त्या दस्तऐवजावर त्यांच्या वडिलांचे साक्षीदार म्हणून नाव टाकण्यास सांगून त्यावर जबरदस्तीने सही घेतल्याचे तक्रारीत म्हटले आहे. दरम्यान, त्यांनी हप्ता देणे बंद केल्यानंतर ऑगस्ट २०२६च्या पहिल्या आठवड्यात खडकाळी सिग्नल येथे संशयित सद्दाम शेख आणि त्याचा एक साथीदार कारमधून आले. त्यांनी तक्रारदार यांना जबरदस्तीने चारचाकीमध्ये बसवून पोटाला चाकू लावला. शिवीगाळ आणि मारहाण करून त्यांना आणि त्यांच्या कुटुंबीयांना जिवे मारण्याची धमकी देत आणखी १ लाख रुपये खंडणी वसूल केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CJI Surya Kant: देशाच्या सरन्यायाधीशांनी घेतली बीडच्या रमाबाईंची दखल; लेकीच्या शिक्षणासाठी धावणाऱ्या महिलेला भरीव मदत

Pune News : विनापरवाना लावणीचा कार्यक्रम; मंडळाच्या अध्यक्षांसह नृत्यांगना राधा पाटील यांच्यावर गुन्हा दाखल

Social Media: 'Likes' मुळे वाढतोय मानसिक ताण? Post's च्या मोहात अडकतात डिप्रेशनग्रस्त लोक; संशोधनातून धक्कादायक खुलासा!

Marathi News Live Updates: तळेगाव ढमढेरे परिसरात विजेमुळे ग्रामस्थ त्रस्त

आई म्हणाली ‘चॉकलेट बंद कर’; स्क्वॉशपटू अनाहतने थेट न्यूट्रिशनिस्टलाच फोन केला! नेमकं काय घडलं? Viral Video

SCROLL FOR NEXT