पान तीन ॲंकर
---------
लोगो घेणे
--------------
14677
नाशिक : बाजारात विक्रीस विविध रूपातील आणि आकारातील गणेश मूर्ती.
गणेशमूर्तींनी सजली बाजारपेठ ; ५०० प्रकारच्या मूर्ती वेधता लक्ष
३० टक्के दरवाढीनंतरही बुकिंगसाठी गणेशभक्तांची स्टॉल्सवर गर्दी
सकाळ वृत्तसेवा
जुने नाशिक, ता. ७ : अवघ्या सात दिवसांवर येऊन ठेपलेल्या गणेशोत्सवाचे सर्वांनाच वेध लागले आहेत. नाशिक शहरातील गणेशमूर्तींची बाजारपेठ विविधरंगी आणि आकर्षक मूर्तींनी सजली आहे. घरगुती तसेच सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांकडून मूर्तींचे बुकिंग करण्यासाठी विक्री स्टॉल्सवर गर्दी वाढू लागली आहे. विविध आकार, आकर्षक रंगसंगती आणि पारंपरिक तसेच आधुनिक रूपातील गणेशमूर्ती ग्राहकांचे लक्ष वेधून घेत आहेत.
बाजारात १० इंचांपासून तब्बल २० फुटांपर्यंतच्या गणेशमूर्ती विक्रीसाठी उपलब्ध आहेत. घरगुती गणेशमूर्तींचे दर साधारण १ हजार ५०० रुपयांपासून सुरू होऊन मोठ्या मूर्तींसाठी दीड लाख रुपयांपर्यंत आहेत. यंदा बाजारात लालबागचा राजा, चिंतामणी, दगडूशेठ हलवाई, जय मल्हार, श्रीनाथ यांसह विविध स्वरूपातील सुमारे ५०० प्रकारच्या गणेशमूर्ती उपलब्ध आहेत.
------
कच्चा माल महागल्याने ३० टक्के दरवाढ
कच्च्या मालाच्या किमतीत वाढ झाल्याने त्याचा थेट परिणाम मूर्तींच्या दरावर झाला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा गणेशमूर्तींच्या किमतीत सुमारे ३० टक्क्यांनी वाढ झाली आहे. दरवाढ असूनही भक्तांचा उत्साह कायम असून, आवडीची व आकर्षक मूर्ती निवडण्यासाठी नागरिक बाजारपेठेत गर्दी करत आहेत. विशेषतः लालबागचा राजा आणि चिंतामणी गणेशाच्या मूर्तींना सर्वाधिक मागणी आहे.
------
बालगणेशाच्या विविध रूपांना चिमुकल्यांची पसंती
गणेशमूर्तींच्या बाजारात यंदा बालगणेशाच्या विविध रूपांनी विशेष आकर्षण निर्माण केले आहे. चिमुकल्यांच्या रूपातील गणपती, चॉकलेट धारी गणेश, डॉक्टर, इंजिनिअर, मिलिटरी जवान अशा कल्पक व आकर्षक स्वरूपातील मूर्ती मुलांसह पालकांचे लक्ष वेधून घेत आहेत. या रूपातील मूर्तींसाठी चिमुकल्यांकडून पालकांकडे हट्ट केला जात आहे.
शाडू अन् हिरेजडित काम केलेल्या मूर्तींचे स्टॉल
शाडूच्या मातीपासून तयार करण्यात आलेल्या पर्यावरणपूरक गणेशमूर्तींनाही मोठी मागणी आहे. द्वारका परिसरात शाडूच्या मूर्तींचे स्टॉल उभारण्यात आले आहेत. दुसरीकडे, प्लास्टर ऑफ पॅरिस पासून तयार केलेल्या विविध रूपांतील मूर्ती आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरत आहेत. यात संपूर्ण हिऱ्यांचे वस्त्र असलेली श्रीनाथ रूपातील मूर्ती, शेठ हलवाई, गोल्डन पेपर आभूषण श्रीनाथ मूर्ती, आणि आकर्षक फेटेधारी मूर्तींचा समावेश आहे.
कच्च्या मालाच्या दरांमध्ये वाढ झाल्याने गणेशमूर्ती तयार करण्यासाठी लागणाऱ्या प्रत्येक साहित्याचे भाव वाढले आहेत. त्याचा परिणाम म्हणून यंदा गणेशमूर्तींच्या दरात सुमारे ३० टक्के वाढ झाली आहे."
- बाळू अमृतकर (मूर्ती विक्रेता, नाशिक)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.