नाशिक

बनावट पीएमओ अधिकारी प्रकरणात मुंबईचे पोलीस पथक शहरात येण्याची शक्यता

CD
बनावट पीएमओ ओळखपत्र प्रकरणाचे नाशिक कनेक्शन! खासगी अंगरक्षक दिलीप कुंदेचा लहवीत-देवळाली कॅम्पशी संबंध; मुंबई पोलिसांकडून पडताळणी शक्य सकाळ वृत्तसेवा नाशिक, ता. ११ : मुंबईतील वांद्रे-कुर्ला संकुलातील (बीकेसी) जिओ वर्ल्ड प्लाझामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यक्रमाच्या आदल्या दिवशी बनावट पंतप्रधान कार्यालयाचे (पीएमओ) ओळखपत्र दाखवून प्रवेश करण्याचा प्रयत्न केल्याच्या प्रकरणाला नाशिक कनेक्शन असल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणात रोहन पारेख याच्यासोबत असलेला खासगी सुरक्षारक्षक दिलीप राजाराम कुंदे याचा लहवीत आणि देवळाली कॅम्प परिसराशी संबंध असल्याचे तपासातून समोर आल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे मुंबई पोलिसांकडून कुंदेच्या नाशिकमधील वास्तव्य, पार्श्वभूमी आणि संपर्कांची माहिती घेतली जाण्याची शक्यता आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मुंबई दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर बीकेसी परिसरात कडेकोट सुरक्षा व्यवस्था असतानाच हा प्रकार उघडकीस आला. रोहन पारेख याने पीएमओ अधिकारी असल्याचे दर्शविणारे संशयास्पद ओळखपत्र दाखवून जिओ वर्ल्ड प्लाझामध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. त्याच्यासोबत दिलीप कुंदे खासगी सुरक्षारक्षक म्हणून उपस्थित होता. सुरक्षा तपासणीदरम्यान कुंदे याच्याकडे परवानाधारक रिव्हॉल्व्हर आणि जिवंत काडतुसे आढळून आली. शस्त्राचा परवाना वैध असल्याचे प्राथमिक तपासात स्पष्ट झाले असले तरी संवेदनशील परिसरात शस्त्र नेण्याची परिस्थिती, त्यासंबंधीचे नियम आणि शस्त्र कोणत्या कारणासाठी बाळगण्यात आले होते, याची चौकशी सुरू आहे. कुंदेचा लहवित व देवळाली कॅम्प परिसराशी असलेला संबंध, त्याचे पूर्वीचे वास्तव्य, शस्त्र परवाना कोठून जारी झाला, त्यासंबंधीची कागदपत्रे तसेच रोहन पारेखशी त्याचा संपर्क कसा आला, याची पडताळणी केली जाण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांचे पथक नाशिकमध्ये येऊन माहिती घेण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र, नाशिकमधील कोणत्याही व्यक्तीचा या प्रकरणातील सहभाग अद्याप निष्पन्न झालेला नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

UPI व्यवहारांवर द्यावे लागणार शुल्क; नीती आयोगाच्या उपाध्यक्षांचे संकेत, कारणही सांगितलं...

Karmad News : उघड्या लिफ्टमधून बियाण्याची पोती नेताना तरुणाचा मृत्यू; कंपनी मॅनेजर, एचआर अधिकारी व कंत्राटदाराविरुद्ध गुन्हा

Delhi Police IPS Transfers : दिल्ली पोलिस दलात मोठा फेरबदल; 5 आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या, कोणाची कुठे नियुक्ती? पाहा बदल्यांची यादी

Bogus Doctor Crime : वारजे, खराडीत बोगस डॉक्टरांवर कारवाई; मनपाच्या बोगस वैद्यकीय व्यावसायिक शोध समितीची कारवाई

Latest Marathi News Live Update : परवानगी नाकारली तरी मुंबईत जाणारच; जरांगेंचा निर्धार

SCROLL FOR NEXT