नाशिक

वडाळागावात अतिक्रमण कारवाईत बेकायदा गोमांस विक्री दुकानावर बुलडोझर

CD
फोटो : A14787 नाशिक : अतिक्रमण निर्मूलन मोहिमेत जेसीबीच्या साह्याने काढण्यात आलेले अतिक्रमण -- वडाळ्यातील गोमांस विक्री दुकान जमीनदोस्त सकाळ वृत्तसेवा जुने नाशिक, इंदिरानगर, ता. १६: महासभेत पूर्व विभागातील अतिक्रमणाचा प्रश्न उपस्थित झाल्यानंतर लगेचच वडाळ्यासह विविध ठिकाणी अतिक्रमण निर्मूलन मोहीम राबविण्यात आली. रस्त्यावरील व्यावसायिक आणि इतर अनधिकृत बांधकामांवर हातोडा चालवण्यात आला. रजा चौक परिसरात गोमांस विक्री होत असल्याची माहिती मिळाल्यानंतर इंदिरानगर पोलिस आणि पूर्व विभागाचे अतिक्रमण निर्मूलन पथकाने संयुक्त कारवाई करत गोमांस विक्री दुकानावर जेसीबी चालवला. कारवाईत १५ हजारांचे ५० किलो गोमांस जप्त करण्यात आले. वडाळ्यातील आलिशान सोसायटी परिसर, पांडवनगरी, म्हाडा वसाहत परिसरात बुधवारी (ता. १६) पूर्व विभागाकडून अतिक्रमण निर्मूलन मोहीम राबविण्यात आली. कारवाईत एक ट्रक साहित्य जप्त करण्यात आले. दरम्यान, एका इमारतीच्या कोपऱ्यावर गोमांस विक्री सुरू असल्याची इंदिरानगर पोलिसांना मिळाली. वरिष्ठ निरीक्षक मनोहर कारंडे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने दुपारी ठिकाणी छापा टाकला. अतिक्रमण पथकास बोलावून संबंधित दुकान जेसीबीच्या साह्याने जमीनदोस्त करण्यात आले. कारवाईत अक्रम इमाम कुरेशी (५८), मुजम्मील नुरोद्दीन शेख (३७), गुफरान सुभान सय्यद (५८) आणि अमजद शेख कुरेशी (४०) यांना ताब्यात घेण्यात आले. घटनास्थळावरून ५० किलो गोमांस जप्त करण्यात आले. घटनेची माहिती मिळताच काही गोरक्षक घटनास्थळी जमा झाले. त्यामुळे काही वेळ तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी तातडीने बंदोबस्त तैनात करून परिस्थिती नियंत्रणात आणली. याप्रकरणी चौघांविरुद्ध इंदिरानगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manoj Jarange: जरांगे पाटील मुंबई दौऱ्यावर ठाम! मधले मुक्काम रद्द, थेट आझाद मैदान गाठणार; सोबतच्यांना माघारी जाण्याचं आवाहन

Palghar News : रुग्णालय राडा प्रकरणात कुंदन संखेसह 22 जणांना दोन दिवसांची पोलीस कोठडी; राहुल घरत न्यायालयीन कोठडीत

Marathi News Live Updates : हैद्राबाद गॅझेटियरचा जीआर दुरुस्त करुन द्या- मनोज जरांगे

Endometriosis & Insulin Resistance: एंडोमेट्रिओसिसचा फक्त गर्भाशयावर नाही, ब्लड शुगरवरही परिणाम होतो? नेमकं कारण काय; जाणून घ्या

UPI MDR Fee: 'यूपीआय'वरील शुल्कावरुन होणाऱ्या आरोपांना सरकारचं स्पष्टीकरण; 95 टक्के व्यवहार मोफतच...

SCROLL FOR NEXT