नाशिक

डॉक्टर पत्नीच्या मृत्यू प्रकरणी पतीस गुन्हे शाखा युनिट १ पथकाकडून अटक

CD
डॉ. नीलेश जेजुरकर अखेर गुन्हे पोलिसांच्या ताब्यात डॉ. मनीषा जेजुरकर आत्महत्या प्रकरण सकाळ वृत्तसेवा नाशिक, ता.१८ : पत्नी डॉ. मनीषा जेजुरकर यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर गेल्या सात महिन्यांपासून फरार असलेल्या संशयित पती डॉ. नीलेश दत्तात्रय जेजुरकर (४२, रा. डिकेनगर, गंगापूर रोड) याला शहर गुन्हे शाखेच्या युनिट क्रमांक एकच्या पथकाने शुक्रवारी (ता. १८) द्वारका सर्कल परिसरातून ताब्यात घेतले. मुंबई उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयाकडून अटकपूर्व जामिनासाठी दिलासा न मिळाल्यानंतरही पोलिसांसमोर शरण न आल्याने त्याचा शोध घेऊन ही कारवाई करण्यात आली. प्रसिद्ध आयुर्वेदतज्ज्ञ डॉ. मनीषा जेजुरकर यांच्या संशयास्पद मृत्यूप्रकरणी डॉ. नीलेश जेजुरकर यांच्याविरुद्ध आठ मार्चला गंगापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. त्यानंतर ते पोलिसांना गुंगारा देत फरार होते. त्यांनी अटकपूर्व जामिनासाठी मुंबई उच्च न्यायालयात अर्ज केला होता. मात्र, १० सप्टेंबरला न्यायालयाने अर्ज फेटाळताना तपासासाठी त्यांची कोठडीत चौकशी आवश्यक असल्याचे नमूद केले. यानंतर जेजुरकर यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. तेथेही त्यांना अटकेपासून दिलासा मिळाला नाही. गुरुवारी सर्वोच्च न्यायालयाने अटकपूर्व जामिनाचा अर्ज फेटाळून पोलिसांसमोर शरण जाण्याचे निर्देश दिले. मात्र, ते शरण न आल्याने पोलिसांनी त्यांचा शोध सुरू केला. पोलिस आयुक्त संदीप कर्णिक, पोलिस उपायुक्त (गुन्हे) किरणकुमार चव्हाण आणि सहायक पोलिस आयुक्त (गुन्हे) संदीप मिटके यांच्या सूचनेनुसार गुन्हे शाखेने कारवाई सुरू केली. युनिट क्रमांक एकचे हवालदार विशाल काठे आणि प्रशांत मरकड यांना जेजुरकर हे द्वारका सर्कल परिसरात येणार असल्याची माहिती मिळाली. वरिष्ठ पोलिस निरीक्षक डॉ. अंचल मुदगल यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने परिसरात सापळा रचून जेजुरकर यांना ताब्यात घेतले. त्यानंतर त्यांना पुढील कायदेशीर कारवाईसाठी गंगापूर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. दरम्यान, पोलिसांनी त्यांच्या चौकशीला सुरुवात केली असून डॉ. मनीषा यांच्याशी घटनेपूर्वी काही वाद झाला होता का, त्यांच्या मृत्यूची घटना नेमकी कशी घडली आणि त्या वेळी घरात कोण उपस्थित होते, यासह अन्य बाबींची माहिती घेतली जात आहे. मृत्यूची परिस्थिती आणि घटनाक्रमाबाबत पोलिसांकडून तपास करण्यात येत आहे. कारवाईत पोलिस उपनिरीक्षक चेतन श्रीवंत, दत्तात्रय पोटे, रमीज शेख, हवालदार प्रवीण वाघमारे, प्रशांत मरकड, विशाल काठे, विशाल देवरे, मिलिंदसिंग परदेशी, संदीप भांड, प्रदीप म्हसदे, महेश साळुंके, गणेश रूमाले, रमेश कोळी, देविदास ठाकरे, रोहिदास लिलके, शर्मिला कोकणी, मनीषा सरोदे, पोलिस अंमलदार मुक्तार शेख, सुनील भोसले, श्रीकांत सूर्यवंशी, नगेश्वर बोरसे, राहुल पालखेडे, अमोल कोष्टी, राम बर्डे आणि समाधान पवार सहभागी होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Surendra Koli : निठारी प्रकरणात निर्दोष मुक्त सुरेंद्र कोलीने जीवन संपवले; २१ वर्षांच्या तुरुंगवासानंतर पुन्हा सुरू केले होते सामान्य आयुष्य

६ वर्षांपासून क्लार्क, पण टायपिंग टेस्टमध्ये तीनदा फेल; जिल्हाधिकाऱ्यांनी डिमोशन करत शिपाई बनवलं

Pune Bus Blaze: शिवाजीनगर चौकात पीएमपी बसला अचानक आग; अग्निशामक जवानाच्या सतर्कतेने प्रवाशांचे प्राण वाचले

Pune Illegal PG Hostels : लोहगावमध्ये ११ बेकायदेशीर पीजी हॉस्टेल सील; विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात घालणाऱ्या जागामालकांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश

Gambling Raid : गंगापूरमध्ये रम्मी जुगार अड्ड्यावर धाड; १.९२ लाखांचा मुद्देमाल जप्त, तिघांसह चौघांवर गुन्हा

SCROLL FOR NEXT