नाशिक

अनधिकृत व्यावसायिकांकडून अतिक्रमण पथकावर हल्ला

CD
पान चार -------------- 14850 नाशिक : अतिक्रमण पथकाशी वाद घालताना व्यावसायिक. महापालिकेच्या अतिक्रमण निर्मुलन पथकावर हल्ला धुमाळ पॉंईट येथील घटना; गुन्हा दाखल सकाळ वृत्तसेवा जुने नाशिक ता.२२: मेन रोड धुमाळ पॉईंट येथे अनधिकृत अतिक्रमण हटविण्यासाठी गेलेल्या पथकावर येथील व्यावसायिकांकडून हल्ला करत मारहाण करण्यात आली. मंगळवारी (ता.२२) सायंकाळी ही घटना घडली. याप्रकरणी सरकारवाडा पोलिस ठाण्यात उशिरापर्यंत तक्रार दाखल करण्याचे काम सुरू होते. मेन रोड, शालिमार आणि धुमाळ पॉईंट ते दहिपूल भागात पश्चिम विभागाच्या पथकाकडून अतिक्रमण हटविण्याची कारवाई सुरू होती. इतर ठिकाणची कारवाई करत पथक धुमाळ पॉईंट परिसरात दाखल होऊन रस्त्याला अडथळा ठरणारे साहित्य जप्त करत होते. साहित्य जप्त करण्यात आलेल्या व्यवसायिकांनी अचानक पथकातील कर्मचाऱ्यांवर हल्ला करत मारहाण केली. त्यामुळे परिसरात तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. घटनेची माहिती पोलिस आणि महापालिका अधिकाऱ्यांना मिळताच त्यांनी घटनास्थळी दाखल होत माहिती घेतली. इतर व्यावसायिकांनीही त्या ठिकाणी गोंधळ घातला. त्यामुळे परिसरात मोठ्या प्रमाणावर गर्दी झाली होती. पोलिसांनी मध्यस्थी करत अतिक्रमण पथकास सरकार वाडा पोलिस ठाण्यात पाठविण्यात आले. व्यवसायिकाचे कुटुंबीय आणि कर्मचाऱ्यांचे कुटुंबीय देखील यावेळी एकमेकांसमोर आल्याने तणावात वाढ झाली होती. यापूर्वी येथील अनाधिकृत व्यावसायिकांकडून अशा प्रकारे अतिक्रमण पथकासह सामान्य नागरिकांशी वाद घालण्याच्या घटना घडल्या आहेत. मंगळवारी घडलेल्या घटनेनेही परिसरात तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. संबंधित व्यावसायिकांवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आल्याने पथकाने सरकारवाडा पोलिस ठाण्याचा मार्ग धरला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

तुरुंगातून सुटल्यानंतर संतोष पंडित यांचा पहिला व्हिडीओ, रस्त्यात खड्ड्याला घातला हार; पाहा video

IND vs JPN: ३२ धावा करूनही भारताने जपानला हरवलं! २ धावांच्या थरारक विजयासह टीम इंडियाने रचला असा वर्ल्ड रेकॉर्ड, जो आजपर्यंत कुणालाच जमला नाही

PPF की NPS? दरमहा 5000 रुपयांच्या गुंतवणुकीतून उभे राहतील दीड कोटी रुपये; जाणून घ्या संपूर्ण गणित

Marathi News Live Updates: पिंपरी चिंचवडमध्ये मुसळधार पाऊस

साहील मृत्यू प्रकरणात नवा ट्विस्ट! परीक्षेदरम्यान प्राध्यापकांनी बाजूला नेलं अन्..., CCTV फुटेज समोर, 15 मिनिटांत काय घडलं?

SCROLL FOR NEXT