नाशिक

ओझर ह‌द्दीतील एअरफोर्स कॉर्नर येथे उड्डाणपूल कधी या ठिकाणी उड्‌डाणपुल होण्यासाठी जनसेवा मंडळाचे केंद्रीय रस्ते व वाहतुक मंत्री, नितिन गडकरी यांना साकडे

CD
पान-१ ------------ OZM26B13916 ओझर ः हद्दीतील एअरफोर्स कॉर्नर येथे उड्डाणपूल व्हावा यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना इगतपुरी येथील कार्यक्रमावेळी (२०२२) निवेदन देताना भाजप जिल्हाध्यक्ष यतीन कदम, माजी मंत्री डॉ. भारतीताई पवार आणि एनएचएआयचे अधिकारी. ------------ ओझरच्या एअरफोर्स कॉर्नरवर उड्डाणपूल कधी? ------------ मंत्री नितीन गडकरी यांना दिलेल्या निवेदनावर साडेचार वर्षांनंतरही कार्यवाही शून्य! ------------- सकाळ वृत्तसेवा ओझर, ता. १४ ः मुंबई- आग्रा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक तीनवरील ओझर हद्दीतील एअरफोर्स कॉर्नर येथे उड्डाणपूल उभारण्यात यावा, गावकऱ्यांना ये- जा करण्यासाठी जोड रस्ता द्यावा, या मागणीसाठी ''जनसेवा मंडळा''ने केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांना साकडे घातले होते. इगतपुरी येथे १८ डिसेंबर २०२२ ला एका कार्यक्रमात भाजपचे विद्यमान जिल्हाध्यक्ष यतीन कदम आणि माजी केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांच्या उपस्थितीत गडकरींना यासंबंधीचे सविस्तर निवेदन देण्यात आले होते. मात्र, या घटनेला आता तब्बल साडेचार वर्षे उलटूनही कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही. त्यामुळे या निवेदनाला प्रशासनाने केराची टोपली दाखवली का? असा संतप्त सवाल ओझरच्या जनसामान्यांमधून विचारला जात आहे. --------------- २०-२ गावाची झाली दोन भागात विभागणी ओझरची लोकसंख्या आता एक लाखाच्या पुढे गेली आहे. गावाच्या मधोमध गेलेल्या राष्ट्रीय महामार्गामुळे ओझरचे पूर्व आणि पश्चिम असे दोन भाग पडले आहेत. महामार्गाच्या पश्चिम भागात भारतीय वायू सेनेची (IAF) मोठी वसाहत आणि ओझर विमानतळ (दुरुस्ती डेपो) आहे. याशिवाय गावाचे मुख्य बसस्थानक, ग्रामदैवत श्री दुर्गादेवी मंदिर, केंद्रीय विद्यालय, एचएएल (HAL) कंपनी, शीख बांधवांचे गुरुद्वारा, गोल्डन डेज युनिव्हर्सल स्कूल आणि रेयान इंटरनॅशनल स्कूल यांसारख्या महत्त्वाच्या संस्था याच भागात आहेत. ओझरमधील बहुतांश विद्यार्थी याच शाळांमध्ये शिकतात. आंतरराष्ट्रीय दर्जाचे कार्गो हब आणि हॅलीकॉनसारखे मोठे प्रकल्पही याच परिसरात आहेत. २०-२ कोट्यवधींचे बसस्थानक शोभेची वस्तू! शासनाने नुकतेच सुमारे दीड ते दोन कोटी रुपये खर्च करून पश्चिम बाजूला अद्ययावत बसस्थानक उभारले आहे. मात्र, महामार्गावर उड्डाणपूल नसल्यामुळे राज्य परिवहन महामंडळाच्या बस या बसस्थानकात येतच नाहीत. परिणामी, ओझर आणि आजूबाजूच्या २५ ते ३० गावांतील प्रवाशांना, विद्यार्थ्यांना आणि ज्येष्ठ नागरिकांना खासगी किंवा भाड्याच्या वाहनांचा आधार घ्यावा लागत आहे. यामुळे आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत असून नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे. २०-२ शेतकऱ्यांना ५ ते ६ किमीचा फेरफटका ओझरच्या परिघातील दिंडोरी तालुक्यातील जानोरी, आंबे, अक्राळे, मोहाडी, पालखेड बंधारा, जऊळके आणि निफाड तालुक्यातील गावांमधून द्राक्ष निर्यातीसाठी मोठ्या प्रमाणात कंटेनरची वाहतूक होत असते. उड्डाणपुलाअभावी या वाहनांना आणि स्थानिक शेतकऱ्यांना मोठा अडथळा निर्माण होतो. पश्चिम भागात मोठ्या संख्येने राहणाऱ्या सेवानिवृत्त संरक्षण कर्मचाऱ्यांना (Military Veterans) मुख्य गावात येण्यासाठी ५ ते ६ किलोमीटरचा प्रदीर्घ फेरफटका मारावा लागत आहे. नवरात्रोत्सवात दुर्गादेवीच्या यात्रेसाठी येणाऱ्या लाखो भाविकांनाही जीव मुठीत धरून महामार्ग ओलांडावा लागतो. या वाहतूक कोंडीमुळे एकेकाळी मोठी व्यापारी पेठ म्हणून ओळखली जाणारी ओझरची बाजारपेठ आता ओस पडू लागली आहे. २०-२ सिंहस्थाआधी कामाची मागणी सध्या महामार्गावरील ''दहावा मैल'' परिसरात उड्डाणपुलाचे काम प्रगतीपथावर आहे. याच कामासोबत एअरफोर्स कॉर्नर येथील उड्डाणपुलाचे कामही मंजूर करून ते आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर तातडीने पूर्ण करावे, अशी आग्रही मागणी ओझरकर ग्रामस्थ आणि जनसेवा मंडळाच्या वतीने करण्यात आली आहे. -------------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

High Court : ती मशीद नाही तर देवी सरस्वतीला समर्पित मंदिर ; उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण ऐतिहासिक निकाल

हार्दिक श्रेयस विसरा! रवी शास्त्रींनी टीम इंडियाच्या कॅप्टन्सीसाठी सुचवलं 'हे' नाव म्हणाला मला...

Suvendu Adhikari: बंगालचे मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी यांनी राजीनामा दिला; कोणती जागा सोडली? राजीनाम्यानंतर भावूक प्रतिक्रिया

Hingoli News: ई-पीकच्या नोंदींची होणार पडताळणी;पारदर्शकतेसाठी नवी नियमावली; चुका टाळण्यासाठी प्रशासनाचे पाऊल

राजवाडेंच्या पार्टीसाठी स्वानंदीचा हटके लूक, स्टायलिश गाऊनमध्ये तेजश्रीला पाहताच चाहते घायाळ, फोटो व्हायरल

SCROLL FOR NEXT