नाशिक

पहिल्याच पावसात ओझर शहर जलमय;महाराणा प्रताप चौकाला तलावाचे स्वरूप

CD
फोटो- 14096 ओझर ः महाराणा प्रताप चौकात मंगळवारी साचलेल्या पाण्यातून कसरत करत जाणारे दुचाकीस्वार. पहिल्याच पावसात ओझर जलमय महाराणा प्रताप चौकाला तलावाचे स्वरूप ओझर, ता. २३ : येथे मंगळवारी (ता. २३) पावसाने जोरदार हजेरी लावत तब्बल दीड ते दोन तास मुसळधार बरसात केली. या पावसामुळे अनेक भागांत पाणी साचले असून, मध्यवर्ती ठिकाण असलेल्या महाराणा प्रताप चौक परिसराला अक्षरशः नदी व तलावाचे स्वरूप प्राप्त झाले होते. रस्त्यावरून ये-जा करणाऱ्या महिला, विद्यार्थी व नागरिकांसह वाहनचालकांना पाण्यातून मार्ग काढताना कसरत करावी लागली. पावसाळा सुरू होण्यापूर्वी ओझर नगर परिषदेने योग्य नियोजन केले नसल्याचा आरोप नागरिकांनी केला. चौक परिसरात मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने वाहतुकीवर परिणाम झाला. काही दुकानांत पाणी शिरल्याने नुकसान झाले. काही घरांमध्येही पाणी शिरले. या घटनेनंतर संतप्त नागरिकांनी नगर परिषदेच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना घेराव घालत कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणी केली. द रवर्षी पावसाळ्यात निर्माण होणारी ही समस्या लक्षात घेऊन संबंधित प्रशासनाने तातडीने योग्य नियोजन करून नागरिकांना दिलासा द्यावा, अशी मागणी होत आहे. .............. कोट महाराणा प्रताप चौक परिसरात पावसाचे पाणी साचल्याने नागरिकांना विविध समस्यांना तोंड द्यावे लागले. नगर परिषदेचे कर्मचारी व अधिकाऱ्यांशी चर्चा करून या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्याच्या सूचना दिल्या. पाण्याचा निचरा सुरळीत होण्यासाठी नवीन पाइपलाइन टाकण्याबाबत आवश्यक कार्यवाहीचे निर्देश दिले. नागरिकांना दर वर्षी या समस्येला सामोरे जावे लागू नये, यासाठी प्रशासनाने तातडीने नियोजन करावे. यतीन कदम, जिल्हाध्यक्ष, भारतीय जनता पक्ष ................................................................ दिंडोरी तालुक्यातही दमदार हजेरी दिंडोरी ः तालुक्यात मंगळवारी (ता. २३) दुपारी दीड ते दोन या वेळेत पाऊस झाला. त्यामुळे तालुक्यातील शेतकरी काही प्रमाणात सुखावला. सकाळपासूनच उकाडा जाणवत होता. दुपारी एकनंतर वातावरणात मोठ्या प्रमाणात बदल होऊन दीडला विजांच्या कडकडाटसह मुसळधार पाऊस सुरू झाला. त्यामुळे द्राक्ष बागांमधून पाणी वाहू लागले. काही वेळतच रस्त्यावर पाणीच पाणी झाले. पाऊस पडल्यानंतर वातावरणात गारवा निर्माण झाला. या पावसामुळे शेतातील तन उगवून शेतीची मशागतीची कामे सुरू होतील. अशी शेतकऱ्यांना आशा आहे. ....................................................................

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पुण्यात २ तरुणींचा १९ वर्षीय तरुणावर पहाटे कोयत्यानं हल्ला, घटना CCTVत कैद; धक्कादायक कारण समोर

Dodamarg Eco-Sensitive Area : 'महाराष्ट्राचे ॲमेझॉन' धोक्यात! केंद्राकडून दोडामार्ग तालुका वगळण्याची 'घोड चूक'; वनशक्ती संस्थेचे सरकारला थेट पत्र

Kolhapur Voter List Revision : कोल्हापूर जिल्ह्यातील साडेचार लाख मतदार वगळणार; 'एसआयआर'चे 99.91 टक्के काम पूर्ण, पाहा विधानसभा मतदारसंघनिहाय चित्र

Marathi News Live Updates : भोर तालुक्यातील खड्ड्यांमध्ये भात लावून विद्यार्थ्यांनी वेधले प्रशासनाचे लक्ष

World Record Tiranga Rally: डोंबिवलीत तिरंग्याचा विश्वविक्रमी डौल, ३५ हजार चौरस फुटांच्या ध्वजासह भव्य रॅली

SCROLL FOR NEXT