नाशिक

''जनशांती धाम'' आश्रमात विद्यार्थी वसतिगृहाचा शुभारंभ

CD
''जनशांती धाम'' आश्रमात विद्यार्थी वसतिगृहाचा शुभारंभ सकाळ वृत्तसेवा ओझर, ता. २४ : येथील जनार्दन स्वामी महाराज आश्रमातील देवभूमी जनशांती धाम येथे सुसज्ज वसतिगृहाचा शुभारंभ शांतिगिरी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली झाला. या उपक्रमामुळे शिक्षणासाठी बाहेरगावी येणाऱ्या विद्यार्थ्यांना सुरक्षित, संस्कारयुक्त आणि आपुलकीचे निवासी वातावरण उपलब्ध होणार आहे. -- तरुण पिढीला योग्य दिशा, धर्माची शिकवण आणि संस्कार मिळावेत यासाठी जनार्दन स्वामी मौनगिरीजी महाराज यांनी पन्नास वर्षांपूर्वी या वसतिगृह परंपरेचा शुभारंभ केला होता. तीच परंपरा स्वामी शांतिगिरीजी महाराज अखंडपणे चालवत आहेत. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना लाभ व्हावा यासाठी आता नवीन इमारतीत भव्य हॉल, सुसज्ज निवासी व्यवस्था, स्वतंत्र भोजन व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच विद्यार्थ्यांच्या देखरेखीसाठी वसतिगृह निरीक्षक व व्यवस्थापकांची नियुक्ती करण्यात आली आहे. येथे अत्यंत नाममात्र सेवा देणगीत, तर गरजू विद्यार्थ्यांना मोफत प्रवेश दिला जातो. या शुभारंभप्रसंगी हृदयानंद माऊली, ज्ञानेश्‍वर भुसे, व्यवस्थापक संतोष अनवट, अमर आढाव, प्राचार्य ज्ञानेश्‍वर भालेराव, आनंद आचारी, सुभाष भडके, महेशगुरू शिवपुरी, संदीपगुरू मिश्रा, बाळासाहेब गोडसे, रामनाथ अनाठे, ओमकार पोमनार, आकाश दळवी, गौरव पवार, दीपक जाधव, ओम गाडे यांच्यासह आश्रमीय सेवक व महिला भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. --- फोटो ः 14106 ओझर ः येथे जनशांती धाम आश्रमात वसतिगृहाच्या शुभारंभप्रसंगी हृदयानंद माऊली, ज्ञानेश्‍वर भुसे, संतोष अनवट आदी. ---

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs SL : साई सुदर्शनची माघार; निवड समितीला आठवला मुंबईचा शिलेदार, आता मज्जा येणार

Pune Crime: दूध भेसळप्रकरणी पोलिसांचा धडाका; आणखी १० आरोपी अटकेत, एकूण २४ जणांना बेड्या

Pune Crime: किरकोळ कारणावरून वाद अन् थेट हल्ला; मारहाणीत ५९ वर्षीय महिलेचा मृत्यू, कोलदऱ्यात किरकोळ वादाचा थरारक शेवट

'Yashasvi Jaiswal वर ४ सामन्यांच्या बंदीचे पत्र मॅच रेफरीने लिहून ठेवलं होतं...', अजिंक्य रहाणेचा 'त्या' वादाबद्दल खळबळजनक खुलासा

Godavari River: गंगापूरच्या अमळनेर वस्तीत हृदयद्रावक घटना; गोदावरीच्या पुराच्या पाण्यात बहीण-भावाचा बुडून मृत्यू

SCROLL FOR NEXT