OZM26B14544
ओझर ः मर्चट बँकेच्या सर्वसाधारण सभेत बोलताना अध्यक्ष राजेंद्र शिंदे व उपस्थित सभासद
-----------
३०-२
दि ओझर मर्चंट बँकेतर्फे
दहा टक्के लाभांश : शिंदे
---------------
ओझर, ता.३१ ः दि ओझर मर्चंट्स को- ऑप. बँकेची वार्षिक सर्वसाधारण सभा बँकेचे अध्यक्ष राजेंद्र शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली होऊन सभासदांना दहा टक्के लाभांश देण्याची घोषणा अध्यक्ष राजेंद्र शिंदे यांनी केली.
उपाध्यक्ष प्रवीण लढ्ढा, जनसंपर्क संचालिका मंगला कदम, संचालक भालचंद्र कासार, रवींद्र भट्टड, विजय शिंदे, भारत पल्हाळ, लक्ष्मण सोनवणे, योगेश चांडक, प्रवीण वाघ, शरद सिन्नरकर, रऊफ पटेल, नीळकंठ कदम, श्रीकांत कदम, गणेश बोरस्ते, संचालिका जिजाबाई रास्कर, डॉ. मेघा पाटील, ज्योती भट्टड, अरुण पवार, तज्ज्ञ संचालक ॲड. भूषण जाजू, बोर्ड ऑफ मॅनेजमेंटचे अध्यक्ष संदीप अक्कर, नवनाथ मंडलिक, ॲड. भारत आहेर, तक्रार निवारण समिती सदस्य शिरीष कावळे, मुबीन पठाण, विष्णू पगार आणि मुख्य कार्यकारी अधिकारी दत्तात्रय बापट आदी उपस्थित होते.
या सभेत विविध विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. सभासदांच्या शंकांचे निरसन अध्यक्ष व संचालक मंडळाने केले. उपस्थितांनी त्याला पूर्ण सहमती दर्शवत सर्व विषय एकमताने मंजूर केले. सभासदांना दहा टक्के लाभांश देण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आली त्यास उपस्थित सभासदांनी मान्यता दिली. ऐनवेळी आलेल्या विषयांवरही चर्चा करण्यात आली.
----------------
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.