पान-३ मेन
-----------
OZM26B14567
ओझर ः येथील उड्डाणपुलाच्या कामाची पाहणी करताना आमदार दिलीप बनकर. शेजारी महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी.
---------------
५०-६
ओझरचा उड्डाणपूल सोमवारपासून खुला
---------
आमदार बनकरांकडून पाहणी; दहावा मैल उड्डाणपुलाचे काम तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना
---------
सकाळ वृत्तसेवा
ओझर, ता.३ ः मुंबई- आग्रा महामार्गावरील ओझर येथील एअर फोर्स कॉर्नर ते सायखेडा चौफुली दरम्यानच्या उड्डाणपुलाच्या दुरुस्तीचे काम पूर्ण झाले असून, सोमवारपासून हा पूल वाहतुकीसाठी खुला करण्यात येणार असल्याची माहिती राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी शशांक आडके यांनी दिली.
आमदार दिलीप बनकर यांनी गुरुवारी एअर फोर्स कॉर्नर व दहावा मैल परिसरातील सुरू असलेल्या उड्डाणपुलांच्या कामांची पाहणी केली. कामे लवकरात लवकर पूर्ण करून वाहतूक सुरळीत करण्याच्या सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. एचएएल कामगार संघटनेचे सरचिटणीस संजय कुटे व अध्यक्ष अनिल मंडलीक यांनी कामांमुळे कर्मचाऱ्यांना ये-जा करताना अडचणी येत असल्याने पर्यायी व्यवस्था करण्याची मागणी केली होती. त्यानंतर आमदार बनकर यांनी तातडीने पाहणी केली.
१६-१
कुंभमेळ्यानंतर बोगद्याचे नियोजन
आगामी कुंभमेळ्यानंतर एअर फोर्स कॉर्नर येथे वाहतुकीच्या दृष्टीने बोगदा तयार करण्याचे नियोजन असल्याची माहितीही अधिकाऱ्यांकडून देण्यात आली. या बोगद्यामुळे भविष्यात एअर फोर्स कॉर्नर परिसरातील वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली. गडाख कॉर्नर व सायखेडा फाटा उड्डाणपुलाच्या जागेची स्वच्छता करून पथदिपांची व्यवस्था करण्यात येणार असल्याचे श्री. आडके यांनी सांगितले.
१६-१
नागरिकांच्या प्रमुख मागण्या
- एअर फोर्स कॉर्नर येथे बोगदा तयार करावा.
- गडाख कॉर्नर व सायखेडा फाटा येथे पथदीप व स्वच्छता करावी.
- पुलाखालील मोकळ्या जागेचा गार्डनसह योग्य वापर करावा.
- महामार्गाच्या कामांच्या ठिकाणी दिशादर्शक फलक, रिफ्लेक्टर व कर्मचारी नियुक्त करावेत.
- गरवारे व दहावा मैल येथील उड्डाणपुलांची कामे लवकर पूर्ण करावीत.
----------------
कोट
दहावा मैल उड्डाणपुलावरील वाहतूक सोमवारपासून सुरळीत सुरू करण्यात येईल. उर्वरित उड्डाणपुलांची कामे दोन ते तीन महिन्यांत पूर्ण करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
- शशांक आडके, अधिकारी, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण
-------------
ओझर येथील उड्डाणपूल सोमवारपासून सुरू करण्याबाबत सूचना तसेच एअर फोर्स कॉर्नर येथील बोगदा व उड्डाणपूल खालील स्वच्छतेबाबत अधिकाऱ्यांना सूचना देण्यात आलेल्या आहेत.
- दिलीप बनकर, आमदार, निफाड विधानसभा
----------------
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.