नाशिक

साधुच्या वेशात मध्यप्रदेश मध्ये नर्मदा तीरावर ओझर पोलिसांनी आवळल्या बनावट साधूंच्या मुसक्या

CD
ओझर ः अटक केलेल्या संशयितांसह पोलिस पथक. फोटो- 14602 ओझर चोरी प्रकरणी चोरट्यांना मध्य प्रदेशातून अटक सकाळ वृत्तसेवा ओझर, ता. ६ ः येथील पंचवड गणेश मंदीराजवळ निर्मल स्वीट येथे गेल्या जूनमध्ये दुपारी साडेबाराच्या सुमारास फिर्यादी राकेश शिवप्रसात शर्मा (रा. सावित्री हॉटेलमागे, ओझर) यांच्या दोन तोळ्याच्या सोन्याच्या अंगठ्या दोन साधूंच्या वेशातील संशयितांनी लांबविल्या होत्या. या प्रकरणी ओझर पोलिसांत गुन्हा दाखल होता. सदरचा प्रकार भरदिवसा घडल्याने नागरिकांत भीतीचे वातावरण होते. पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करणाऱ्या संशयितांपर्यंत पोहोचण्यासाठी पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजचा आधार घेतला. ४५ सीसीटीव्ही कॅमेऱ्यांतील हालचाली तपासत तसेच तांत्रिक विश्लेषनाचे आधारे पोलिसांनी अखेर मध्य प्रदेशात संशयितांच्या मुसक्या आवळल्या. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजची बारकाईने पाहणी करून संशयित जालीमनाथ कालुनाथ, बंधननाथ माधुनाथ (दोन्ही रा. कसराबाद, ता. कसराबाद, जि. खरगोन, मध्य प्रदेश) असे असल्याचे तपासात निष्पन्न झाल्याने मध्य प्रदेशात जाऊन संशयितांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून दोन लाख ८० हजारांचे वितळविलेले सोने हस्तगत केले. पोलिसांच्या या कारवाईमुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केले. जिल्हा पोलिस अधीक्षक डी. एस. स्वामी, अपर पोलिस अधीक्षक श्रीमती विमला एम., उपविभागीय अधिकारी संजय बांबळे, प्रभारी अधिकारी महेश कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक रविंद्र खाडे, जितेंद्र बागूल, नीलेश वाघ, हवालदार हेमंत गिलबिले, प्रदीप बहिरम यांच्या पथकाने ही कारवाई केली. संशयितांना आज न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. .............

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

दिल्ली इमारत दुर्घटनेत दोघांचा मृत्यू, पाच जणांची प्रकृती गंभीर; नेमकी कशी घडली घटना? कारण आलं समोर

Pune Highway Robbery: शिरूरमध्ये एसटी बस अडवून चालक-वाहकाला मारहाण; ₹८,९६० लुटले, चौघे जेरबंद, स्कॉर्पिओ जप्त

First Solo Trip Tips: पहिल्यांदाच सोलो ट्रिपला जाताय? मग हे ‘गोल्डन रूल्स’ नक्की लक्षात ठेवा!

Marathi News Live Updates : पुण्यात उद्या MPSC विद्यार्थ्यांच्या आक्रोश मोर्चा

Ram Mandir Trust: राम मंदिर ट्रस्टचे महासचिव स्वामी गोविंद देवगिरीजींचा महाराष्ट्र दौरा संत ज्ञानेश्वर माऊलींच्या चरणी नतमस्तक होऊन सुरू

SCROLL FOR NEXT