नाशिक

ओझर नगरपरिषदेचा वराहांवर ''सर्जिकल स्ट्राईक''

CD
३६-३ ओझरला मोकाट वराहांवर कारवाई नागरिकांना दिलासा : पहाटेच्या कारवाईत ६० वराह जेरबंद ------------- ओझर, ता.८ : शहर, उपनगर आणि ओझर टाउनशिपमधील नागरी वसाहतींमध्ये उच्छाद मांडणाऱ्या मोकाट वराहांवर अखेर नगरपरिषदेने धडक कारवाई केली. शनिवारी पहाटे पाचला सुरू झालेल्या या मोहिमेत तब्बल ६० वराह पकडण्यात आले. या कारवाईमुळे वराहांच्या त्रासाला वैतागलेल्या नागरिकांनी सुटकेचा निःश्वास सोडला. ओझर टाउनशिपमधील नागरी वसाहतीसह लक्ष्मीनगर, यमुनानगर, निवृत्तीनाथनगर, साईधाम, लोहियानगर गणेशनगर, एरिकेशन कॉलनी आदी भागांत वराहांच्या टोळ्यांनी धुमाकूळ घातला होता. रस्ते, गल्लीबोळ तसेच नागरी वसाहतींमध्ये मोकाट फिरणाऱ्या वराहांमुळे नागरिक त्रस्त झाले होते. या समस्येबाबत सत्ताधारी तसेच विरोधी गटातील नगरसेवकांनी नगरपरिषद प्रशासनाकडे निवेदन देत मोकाट वराहांवर तातडीने कारवाई करण्याची मागणी केली होती. मुख्याधिकारी किरण देशमुख, भाजप जिल्हाध्यक्ष यतीन कदम, नगरसेवक महेश शेजवळ व राकेश जाधव, आरोग्य विभागाचे गणेश महाजन, प्रकाश महाले नितीन काळे, किरण कुदे, रोशन कदम आणि सचिन आढाव यांच्या देखरेखीखाली ही कारवाई करण्यात आली. दरम्यान वराहांपाठोपाठ आता भटक्या श्वानांचाही बंदोबस्त करावा, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे. -------------- कोट मोकाट वराह तसेच श्वानांबाबत नगरसेवक आणि नागरिकांच्या तक्रारी नगरपरिषदेला प्राप्त झाल्या होत्या. त्यानुसार वराहांचा बंदोबस्त करण्यात आला. लवकरच भटक्या श्वानांचाही बंदोबस्त केला जाईल. - रूपाली महाले, उपनगराध्यक्ष, ओझर --------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today: दिवाळीआधी सोनं 7 हजारांनी स्वस्त! जळगावच्या सुवर्ण बाजारातही सोन्या-चांदीच्या भावात मोठी घसरण; आजचा ताजा दर किती?

Kieron Pollard Mumbai Indians New Head Coach : ट्वेंटी-२०त १५००० धावा अन् ३४१ विकेट्स... मुंबई इंडियन्सकडून नव्या प्रशिक्षकाची घोषणा; कोण आहे जयवर्धनेचा उत्तराधिकारी?

Crime News: गँगस्टर हिमांशू भाऊ आणि नीरज फरीदपुरिया अमेरिकेत FBI कडून अटक; भारतात आणण्याची प्रक्रिया सुरू

Latest Marathi News Live Update : दिवाळीत फटाके फोडण्यावर हायकोर्टाचे निर्बंध; नियम मोडल्यास कारवाईचा इशारा, कुठे-कुठे फटाके फोडण्यास मनाई?

Protest News: एसआयआर’ रद्द करा, ज्ञानेश कुमार यांचा राजीनामा घ्या; दिल्लीतील आंदोलनात आंदोलकांच्या जोरदार घोषणा

SCROLL FOR NEXT