नाशिक

गणेशोत्सव मंडळांनी बांधिलकी जपत नियमांचे काटेकोर पालन करावे :महेश कुलकर्णी

CD
------------- शांतता समितीच्या बैठकीत महावितरणवर टिकेची झोळ मंडळांनी नियमपालन करावे ः कुलकर्णी ओझर, ता.१० ः गणेशोत्सव साजरा करताना डीजेचा वापर टाळावा आणि ध्वनी डेसीबल मर्यादा ओलांडू नये, पारंपारिक वाद्यांचा वापर करावा. नियमांचे पालन करावे असे आवाहन करत नियम मोडणाऱ्यांवर गुन्हे दाखल करून कडक कारवाई करण्यात येईल असे प्रतिपादन प्रभारी निरीक्षक महेश कुलकर्णी यांनी केले. दरम्यान महावितरणच्या असहकार्याबद्दल बैठकीत प्रचंड टिका झाल्याने काही काळ गोंधळ उडाला होता. ----------- गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर दुर्गामाता मंदिरात शांतता समितीच्या बैठकीत कुलकर्णी बोलत होते. गणेशोत्सव मंडळांकडून वीजजोडणीची अनामत रक्कम घेतली जाते, परंतु आजपर्यंत मंडळाने कोणतीही अनामत रक्कम परत दिली नाही. प्रीपेड मिटरची सक्ती करण्यात येते. हायहोल्टेज ताराची उंची कमी असल्याने दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही,मात्र त्याकडे लश्र दिले जात नाही अशा अनेक समस्यांचा पाढाच मंडळाच्या सदस्यांनी वाचला. मनीष मंडलिक, प्रकाश महाले, प्रशांत पगार आदींनी गावातील रस्त्यातील खड्डे बुजवावे, कमीत कमी कागदपत्रात मंडळांना वीज जोडणी द्यावी, रात्रीचे लोडसेडिंग न करता सुरळीत वीजपुरवठा करावा, विसर्जनासाठी कृत्रिम तलाव निर्माण करावेत, बंद पथदीप दुरुस्त करावे आदी मागण्या करण्यात आल्या. विजवितरणचे अभियंता घनःशाम कुंभार व खाडे यांनी उत्सव काळातील वीजजोडणी व तत्सम सुविधा पुरवण्या विषयी मार्गदर्शन केले. बैठकीस बांधकाम अभियंता सुनील पाटील, अविनाश गवळी, नगरसेवक सुनील कदम, जनसेवा मंडळाचे शब्बीर खाटीक, पोलिस उपनिरीक्षक रवींद्र खाडे तसेच शहरातील सर्व गणेशमंडळांचे प्रमुख उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs AFG : भारत-अफगाणिस्तान पहिला सामना १३ ऐवजी १४ सप्टेंबरला? पोलिसांच्या पत्रानंतर काय निर्णय झाला? महत्त्वाच्या अपडेट्स

Marathi News Live Updates : रुग्णालयातील राड्याला न्यायालयाचा दणका! शिवसेनेचे शहरप्रमुख राहुल घरतची कोठडी वाढली, तिघांचा अटकपूर्व जामीनही फेटाळला

केंद्राचा आदेश पण कर्नाटक भूमिकेवर ठाम! काँग्रेसच्या १९३७ सालच्या ठरावाचं होणार पालन, DK सरकारचा आदेश नेमका काय?

Bail Pola Festival : जात-पात विसरून एकाच माळेत; अमळनेर वस्तीत हिंदू-मुस्लिम बांधवांचा बैलपोळा उत्साहात

MPSC paper leak confession : व्यवस्था कुठेतरी भ्रष्ट आहे, हे आम्हीही मान्य करतो ; आमदार विक्रम पाचपुते यांची स्पष्टोक्ती

SCROLL FOR NEXT