नाशिक

बेकायदेशीरपणे बनावट बुरशीनाशक निर्मिती करणाऱ्यास पिप्री चिंचवड येथून अटक

CD
पान दोन बनावट बुरशीनाशक बनविणाऱ्यास पिंपरी चिंचवडमधून अटक ओझर पोलिसांची कारवाई; वर्षापासून देत होता चकवा सकाळ वृत्तसेवा ओझर, ता. १६ : बेकायदेशीरपणे बनावट बुरशीनाशक निर्मिती करून बायोस्टीम्युलंटचे बनावट लेबल लावून विक्री प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर एक वर्षापासून पोलिसांना गुंगारा देणाऱ्या संशयितास ओझर पोलिसांनी पिंपरी-चिंचवड येथून अटक केली. सागर कैलास शिंदे (वय ३५, रा. कोठुरे, ता. निफाड, जि. नाशिक) असे अटक केलेल्या संशयिताचे नाव आहे. सागर याच्याविरुद्ध १ लाख ६९ हजार ९०४ रुपये किमतीचे बनावट बुरशीनाशक आणि बायोस्टीम्युलंटचे बनावट लेबल तयार करून ते स्वतःच्या ताब्यात ठेवल्याप्रकरणी वर्षभरापूर्वी ओझर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा दाखल झाल्याची माहिती मिळताच तो फरार झाला होता. ओझर पोलिसांचे पथक सागरचा बंगळुरू, गोवा, पुणे, कोल्हापूर आणि कर्नाटक आदी ठिकाणी सातत्याने शोध घेत होते. मात्र, संशयित वेळोवेळी आपले ठिकाण बदलत असल्याने पोलिसांना गुंगारा देण्यात यशस्वी ठरत होता. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन ओझर पोलिस ठाण्याचे निरीक्षक महेश कुलकर्णी यांनी तांत्रिक विश्लेषण करत व मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे संशयित पिंपरी-चिंचवड येथील लोढा बिल्डिंग परिसरात लपून राहत असल्याचे शोधून काढले. त्यानंतर उपनिरीक्षक शशिकांत सैंदाणे, हवालदार मच्छिंद्र कराड आणि बाळू सांगळे यांच्या सायंकाळी पाचला संशयितास अटक केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Live Updates : कळंबा कारागृहात दंगा- आरडाओरड करण्यास मनाई केल्याने अधिकाऱ्याला मारहाण

Manoj Jarange Patil: मोठी बातमी! हैदराबाद गॅझेटियरमध्ये नावंसुद्धा सापडली; विखे पाटलांसह शिष्टमंडळ हैदराबादला जाणार?

Vidyadhar Anaskar : राज्य सहकारी बँकेचे ५,७४५ कोटींचे विक्रमी नेटवर्थ; ठेवी कमी करण्याचा निर्णय व्यावसायिक गणितातून

पाकिस्तानचं नवीन नाटक! PCB नंतर आता हॉकी संघाने भारतात येण्यास दिला नकार; म्हणतात, आमच्या खेळाडूंना सुरक्षित वातावरण हवंय...

CM Devendra Fadnavis : मनोज जरांगे पाटील यांच्या १३ पैकी १२ मागण्या मान्य! आंदोलन करून गणेशोत्सवावर ताण आणू नका; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आवाहन

SCROLL FOR NEXT