नाशिक

भांडवली मूल्याधारित करप्रणालीला ओझरमध्ये विरोध

CD
ओझरला भांडवली मूल्याधारित करप्रणालीला विरोध करवाढीला तूर्त स्थगिती देण्याची राष्ट्रवादी काँग्रेसची मागणी ओझर, ता. २० ः ओझर नगर परिषदेच्या प्रस्तावित ‘भांडवली मूल्याधारित करप्रणाली’ला राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते तथा नगरसेवक प्रमोद कुटे यांनी विरोध केला. नगर परिषदेच्या आगामी सर्वसाधारण सभेच्या अजेंड्यावर असलेल्या करप्रणालीच्या विषयाच्या पार्श्वभूमीवर कुटे यांनी नगराध्यक्ष व मुख्याधिकाऱ्यांना निवेदन देत नवीन करप्रणाली लागू करण्यास तूर्त स्थगिती देण्याची मागणी केली. नगर परिषदेत रूपांतर झाल्यानंतर मालमत्ता कराच्या रचनेत स्वच्छता कर, पथदीप कर, वृक्ष कर, शिक्षण कर आणि रोजगार हमी कराचा समावेश करण्यात आल्याचे निवेदनात म्हटले आहे. यात खुल्या भूखंडांवर १२, निवासी इमारतींवर १७, तर व्यावसायिक गाळ्यांवर ६८ टक्क्यांपर्यंत वाढ होत असल्याचा दावा केला आहे. त्यामुळे जुन्या नोंदणीकृत मालमत्ताधारकांवर अतिरिक्त आर्थिक भार पडणार असून, जुन्या मालमत्तांचे करदर कायम ठेवावेत, अशी मागणी कुटे यांनी केली. गोदामे, शीतगृहे, शेड, गोठे, शिक्षण संस्था, व्यायामशाळा तसेच दवाखान्यांना कर आकारणी करताना सवलतीचे दर लागू करावेत, अशीही मागणी निवेदनात केली आहे. घरगुती सौर उपकरणे बसविणाऱ्या नागरिकांना तसेच आगाऊ मालमत्ता कर भरणाऱ्यांना नाशिकच्या धर्तीवर करसवलत देण्याची सूचनाही केली आहे. इमारतीच्या वयोमानानुसार घसारा मूल्य विचारात घेऊन मालमत्ता करात सवलत द्यावी, अशी मागणीही करण्यात आली आहे. करवाढ न करता नगर परिषदेचे उत्पन्न वाढविण्यासाठी करचुकवेगिरी करणाऱ्या मालमत्ता धारकांना कराच्या कक्षेत आणणे, थकबाकी वसुलीसाठी विशेष मोहीम राबविणे, शहरातील होर्डिंग्ज व जाहिरातींच्या कर वसुलीबाबत धोरण तयार करणे, निवासी मालमत्तांचा व्यावसायिक वापर होत असल्यास त्यांच्याकडून व्यावसायिक दराने कर आकारणी करणे, असे पर्याय निवेदनात देण्यात आले आहेत. इतर नगर परिषदांमधील कररचनेचा अभ्यास करून ओझर नगर परिषदेसाठी योग्य करप्रणाली निश्चित करण्यासाठी नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष, गटनेते तसेच नगरसेवकांचा समावेश असलेली समिती स्थापन करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. करप्रणालीचा अभ्यास पूर्ण होईपर्यंत नवीन करपद्धती लागू करू नये आणि करवाढीचा विषय सर्वसाधारण सभेत तूर्त स्थगित ठेवावा, अशी मागणीही निवेदनातून करण्यात आली आहे. निवेदनावर गटनेते प्रमोद कुटे, उषा गवळी, अशोक कदम, शिल्पा पगारे-ढेंगळे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jaykumar Gore Solapur : सोलापूर जिल्हा बँकेच्या निवडणुकीत भाजपचा ‘प्लॅन’ ठरला? जयकुमार गोरे काय म्हणाले?

Tata Sons N Chandrasekaran : टाटा सन्सच्या अध्यक्षपदावरून वाद; चंद्रशेखरन यांच्या फेरनियुक्तीला टाटा ट्रस्टचा विरोध

'खीर बनवणाऱ्यालाच आधी चाखावी लागते!' ‘सूर्यवंशम’चा उल्लेख करत गौरव कपूरने बिग बींची घेतली फिरकी, Viral Video

Marathi News Live Updates : जम्मू-काश्मीरमध्ये लाचखोरीप्रकरणी कृषी अधिकाऱ्यासह तिघांना अटक

Government Officer Mobile Video : खासदारांच्या काजू-बदामनंतर आता अधिकाऱ्यांचा असंवेदनशील चेहरा; कृषिमंत्र्यांच्या दुष्काळ आढावा बैठकीत मोबाईलमध्ये दंग

SCROLL FOR NEXT