नाशिक

वडाळा येथील मांगीरबाबा चौकात गतिरोधक टाकण्याची मागणी

CD
फोटो : B11903 वडाळा : दुभाजकावर चढलेली घंटागाडी -- शंभरफुटी रस्त्यावर घंटागाडी दुभाजकावर चढली वडाळागावात गतिरोधकाअभावी नागरिक हैराण इंदिरानगर, ता. १५ : वडाळा गावातून जाणाऱ्या शंभरफुटी रस्त्यावर मांगिरबाबा चौकात गतिरोधक बसविण्याची मागणी होत आहे. गतिरोधक नसल्याने रोज येथे किरकोळ अपघात सुरू झाले आहेत. शुक्रवारी (ता.१५) देखील एक घंटागाडी थेट दुभाजकावर चढली. क्रेनद्वारे ती बाजूला करण्यात आली. द्वारका सर्कल येथे अंडरपासच्या कामामुळे पुणे महामार्गाकडून येणारी अवजड वाहने वडाळागाव, इंदिरानगर, वडाळा पाथर्डी रस्त्याने जातात. जुने वडाळा गाव व नवीन वडाळा गावातील सादिकनगर, मेहबूबनगर, गुलशननगर, मुमताजनगर, अण्णाभाऊ साठेनगरसह परिसरातील नागरिकांना ये-जा करण्यासाठी या चौकातून मार्गक्रमण करावे लागते. मात्र, वर्दळीमुळे हा चौक धोकादायक झाला असतानाही अद्यापही या ठिकाणी गतिरोधकाचा विचार होत नसल्याने नाराजी व्यक्त होत आहे. बेफाम वेगाने वाहने जातात. त्यामुळे विद्यार्थ्यांना आणि नागरिकांना जीव मुठीत घेऊन मार्गक्रमण करावे लागते. त्यातूनच लहान-मोठे अपघात घडत आहेत. कोणत्याही गंभीर अपघाताच्या घटनेची वाट न पाहता तातडीने मांगिरबाबा चौकात गतिरोधक बसविण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Navi Mumbai: नवी मुंबईत आंतरराष्ट्रीय बिझनेस सेंटर उभारणार! CIDCO चा मोठा प्रकल्प; व्यापार आणि गुंतवणुकीला मोठी चालना

IPL 2026: अम्पायरला शिवी दिली! Mumbai Indians च्या दिग्गजावर कारवाई; पंजाब किंग्सविरुद्धच्या सामन्यात घातला राडा अन्...

आता पडद्यावर न पाहिलेले सीन्सही दिसणार! 'Dhurandhar 2' OTT वर प्रदर्शित होणार, कधी, कुठे? वाचा

Paper Leak Case: १० लाखांत कुरिअरने आला, १५ लाखांना विकला अन्... महाराष्ट्रात NEET चा पेपर कसा फुटला? धक्कादायक खुलासा

Dunes League T20 : क्रिकेटच्या कक्षा रुंदावतायेत! सौदी अरेबिया फ्रँचायझी लीगच्या मैदानात; युवराज सिंग ब्रँड अ‍ॅम्बेसेडर

SCROLL FOR NEXT