प्रभाग ३१ मध्ये
सेवा शिबिर
इंदिरानगर : पाथर्डी येथील सोन्याताई फाउंडेशनतर्फे प्रभाग ३१ मध्ये २८ जूनपर्यंत सेवा शिबिराचे आयोजन केल्याची माहिती शिवसेना (उबाठा) नगरसेविका माधुरी डेमसे यांनी दिली आहे. पाथर्डी फाटा येथील आर. के. लॉन्सजवळ असलेल्या पक्षाच्या संपर्क कार्यालयात हे शिबिर सुरू असून आहे. शिबिरात प्रधानमंत्री आवास योजना, आयुष्मान भारत कार्ड, श्रमयोगी मानधन योजना, प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना, रेशन कार्ड केवायसी, प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना अशा विविध शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी आवश्यक ते मार्गदर्शन करून शिबिरात मोफत नोंदणी सेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे. सकाळी दहा ते सायंकाळी सहापर्यंत नागरिकांना विविध शासकीय योजनांचे कार्डदेखील उपलब्ध केले जाणार आहे.