फोटो : B12124
वासननगर : पाईपलाईनच्या कामासाठी बंद करण्यात आलेला रस्ता
--
रस्ता बंदमुळे वाहनचालकांची हमरीतुमरी
इंदिरानगर, ता. २४ : प्रभाग क्रमांक ३१मधील वासननगर येथे पाईपलाईन टाकण्याच्या कामामुळे रस्ता बंद करण्यात आला आहे . त्यामुळे वाहतुकीचा खोळंबा झाल्याने बुधवारी सकाळी वाहनचालकांचे वाद हाणामारीपर्यंत पोचले होती. मागील आठवड्यात या कामात ड्रेनेजची पाईपलाईन फोडल्यानंतर याबाबत ‘सकाळ’ मध्ये वृत्त प्रसिद्ध केले. त्यानंतर ही दुरुस्ती सुरू करण्यात आली आणि कामानेदेखील वेग घेतला. मात्र पावसामुळे सर्वत्र चिखल झाल्याने रस्ते बंद करण्यात आले. दोन्ही बाजूला जेसीबी व मातीचा ढिगारा असून एका बाजूने छोटासा रस्ता केला आहे. परंतु यामुळे अपघात होण्याची शक्यता आहे. सकाळी छोटी- मोठी वाहने एकत्र आल्याने आपापसात वाद होऊन प्रकरण हाणामारीपर्यंत आले होते. काही ज्येष्ठ नागरिकांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने प्रकरण मिटले. मनपा अधिकाऱ्यांनी याची दखल घेऊन हे काम तातडीने पूर्ण करण्याची मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.