नाशिक

इंदिरानगर च्या तरण तलाव भागात इतर खेळांची सुविधा देण्याची मागणी

CD
फोटो : B12133 सदिच्छानगर : प्रगतिपथावर असलेले आंतरराष्ट्रीय दर्जाच्या जलतरण तलावाचे काम -- इंदिरानगरच्या तरण तलाव भागात इतर खेळांची सुविधा देण्याची मागणी इंदिरानगर, ता. २५ : वडाळा-पाथर्डी रस्त्यावरील सदिच्छानगर भागात १६ कोटी रुपये खर्चाचा आंतरराष्ट्रीय दर्जाचा जलतरण तलाव उभारला जात आहे. या परिसरात इतर खेळांसाठी आवश्यक सुविधा आणि महिलांसाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात यावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. १० मार्च २०२४ ला या कामाचा शुभारंभ झाला असून, येत्या काही महिन्यांत हा प्रकल्प पूर्णत्वास जाणार आहे. या भव्य तलावाला छत्रपती संभाजी महाराज जलतरण तलाव असे नाव देण्यात आले आहे. ५० मीटर लांबीचा हा तलाव आंतरराष्ट्रीय मापदंडानुसार तयार केला जात असून, एकाच वेळी ५०० जण येथे पोहू शकतील. शहरातील स्वातंत्र्यवीर सावरकर तरण तलाव आणि नाशिक रोडच्या बिटको परिसरातील तलावानंतर हा तिसरा महत्त्वाकांक्षी प्रकल्प ठरणार आहे. १५ वर्षांपासून प्रतीक्षेत असलेल्या इंदिरानगर-पाथर्डी भागातील नागरिकांना क्रीडा सुविधांचा प्राधान्याने लाभ मिळावा, यासाठी याच परिसरात इतर खेळांसाठी स्वतंत्र व्यवस्था आणि महिलांसाठी स्वतंत्र वेळ देण्याची मागणी केली जात आहे. आमदार सीमा हिरे यांच्या विकास निधीतून हे काम होत आहे. दरम्यान, नागरिकांच्या या सर्व मागण्या आमदार हिरे यांच्यापर्यंत पोचविल्याची माहिती नगरसेवक तथा भाजप गटनेते ॲड. श्याम बडोदे यांनी दिली. ---कोट नागरिकांच्या मागण्या माझ्यापर्यंत पोचल्या आहेत. अतिरिक्त सुविधांसाठी आणखी पाच कोटीच्या निधीची मागणी शासनाकडे केली असून, त्याचा पाठपुरावा सुरू आहे. - सीमा हिरे, आमदार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Air India Flight Incident : एअर इंडियाचे विमान अचानक पाकिस्तानात पोहोचले, वैमानिकावर कारवाई; चूक की जाणीवपूर्वक रचलेले कारस्थान?

Hidkal Reservoir Fort : 50 वर्षांनंतर हिडकल जलाशयातून बाहेर आलं मोठं रहस्य; पाणी आटताच समोर आला थरारक इतिहास, 'या' किल्ल्याची स्थापत्यकला पाहून थक्क व्हाल

Tax Refund: आता अवघ्या 7 दिवसांत खात्यात जमा होणार टॅक्स रिफंड! पण त्याआधी 'हे' काम करणे आवश्यक

Latest Marathi News Live Update : स्मार्ट मीटर सक्ती विरोधात यवतमाळमध्ये सर्वपक्षीय नेत्यांचे रस्तारोको आंदोलन

Sanjay Dina Patil Controversy : खासदार संजय दिना पाटलांची पत्रकारांना जीवे मारण्याची धमकी, पोलिसांसमोरच अर्वाच्य शिव्या

SCROLL FOR NEXT