नाशिक

पांडवलेणी यात्रेत काही तासात लाखोंची उलाढाल

CD
फोटो : B12621 पांडव लेणी : पांडवलेणीच्या पायथ्याशी भरणाऱ्या महादेवाच्या यात्रेत झालेली गर्दी -- पांडवलेणी यात्रेत लाखोंची उलाढाल कुस्त्यांच्या दंगलीला प्रतिसाद; भाविकांची हजेरी इंदिरानगर, ता. ३१ : शेकडो वर्षांची परंपरा असलेल्या श्रावण महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी पांडवलेणीच्या पायथ्याशी भरणाऱ्या महादेवाच्या यात्रेत काही तासात लाखोंची उलाढाल झाली. यामुळे शेकडो व्यावसायिकांच्या चेहऱ्यावरती हसू फुलले. यात्रेनिमित्त झालेल्या कुस्त्यांच्या दंगलीला मोठा प्रतिसाद मिळाला. भाजप नेते महेश हिरे यांच्या हस्ते पिंपळगाव खांब येथील संदीप जाधव आणि हरसुल येथील पुंडलिक बेंडकोळी यांची ५ हजाराची कुस्ती लावून प्रारंभ करण्यात आला. सिडको सभापती बाळकृष्ण शिरसाठ, नगरसेवक भगवान दोंदे, शरद फडोळ, सुनील कोथमिरे, मदन डेमसे, त्र्यंबक कोंबडे, बाकेराव डेमसे आदींची प्रमुख उपस्थिती होती. सकाळी पारंपारिक पद्धतीने महादेव आणि धर्मराजची पूजा करण्यात आली. खेळण्यांच्या, खाऊच्या, किरकोळ वस्तूंच्या दुकानांना तसेच रहाट पाळणे आणि करमणुकीच्या साधनांचा ग्रामस्थांनी आनंद घेतला. त्र्यंबकेश्वर, घोटी, वाडीवर्हे, गोंदे, पाथर्डी, पिंपळगाव खांब, वडनेर, नाशिक रोड, राजूर, सारूळ, मुंडेगाव आणि शहरातील विविध भागातील मल्लांनी हजेरी लावली. विजेत्यांना धर्मराज मित्रमंडळातर्फे रोख बक्षीस देण्यात आली. संजय जाचक, रामदास गवळी, अशोक कोंबडे, गंगाधर गवळी, कारभारी जाचक, रामदास जाचक, दिनकर भुसारे, तानाजी गवळी, खंडू धोंगडे आदी पंच होते. या वेळी सोसायटीचे अध्यक्ष दत्ता डेमसे, विठोबा डेमसे, बाकेराव डेमसे, धनंजय गवळी, संदीप दोंदे, विष्णू डेमसे, निवृत्ती गवळी, नामदेव गवळी, झुंबर डेमसे, वामन जाचक, एकनाथ नवले, मकाजी कोंबडे, राजू ढगे, कारभारी जाचक, रमेश जगताप, दत्तात्रेय डेमसे, पांडुरंग शिरसाठ, विष्णुपंत गवळी, कारभारी जाचक, प्रमोद जाचक आदी उपस्थित होते. इंदिरानगर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक मनोहर कारंडे यांच्या नेतृत्वाखाली चोख बंदोबस्त ठेवला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

दिल्ली-महाराष्ट्रात कोट्यवधी मतदारांची नावं वगळली; SIR ड्राफ्टमध्ये तुमचं नाव आहे का? कसं चेक करायचं?

Horoscope: जन्माष्टमीच्या दिवशी ग्रहांची खास स्थिती; ‘या’ ४ राशींचं नशीब अचानक चमकणार? पैसा, करिअरमध्ये प्रगतीसह मोठ्या धनलाभाचे संकेत

जंतर-मंतर CJP आंदोलनातील विद्यार्थ्यांवरील FIR मागे घेण्यासाठी सरकारची सुप्रीम कोर्टात धाव; काय आहे अनुच्छेद 142?

Marathi News Live Updates : भारतातील बोगदा बचाव पथकाची नेपाळी लष्करासोबत भागीदारी

‘निपुण’ भारतीय नौदलाच्या ताफ्यात दाखल! खोल समुद्रातील मोहिमा करणार, पाणबुडी बचाव क्षमतेला बळ; पाहा वैशिष्ट्ये

SCROLL FOR NEXT