नाशिक

कृषी समृद्धी चे नाव अजितदादा पवार कृषी समृद्धी योजना करण्याची मागणी

CD
पान दोन ------------ 12625 मुंबई: उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना निवेदन देताना जिल्हाध्यक्ष विष्णुपंत म्हैसधुणे, सोमनाथ बोराडे, बाळासाहेब म्हस्के. ‘शासनाच्या कृषी समृद्धीचे नाव अजितदादा पवार कृषी समृद्धी करा’ इंदिरानगर, ता. २ : राज्य सरकारकडून राबवण्यात येणाऱ्या ''कृषी समृद्धी योजना'' चे ‘अजितदादा पवार कृषी समृद्धी योजना’ असे नामकरण करण्याची मागणी नाशिक जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडे जिल्हाध्यक्ष विष्णुपंत म्हैसधुणे यांनी निवेदनाद्वारे केली आहे. या प्रसंगी नाशिक तालुकाध्यक्ष बाळासाहेब मस्के आणि देवळाली मतदारसंघ अध्यक्ष सोमनाथ बोराडे उपस्थित होते. विदर्भ व मराठवाड्‌यातील अनेक जिल्ह्यांमध्ये नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना राबविण्यात येत आहे. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना शेततळे, गोदामे, ठिबक सिंचन, तुषार सिंचन, मिनी ट्रॅक्टर, आधुनिक कृषी यंत्रसामग्री आदींसाठी शासकीय अनुदान उपलब्ध करून दिले जाते. या योजनेच्या माध्यमातून राज्यातील शेतकऱ्यांना ठिबक व तुषार सिंचन संच, शेततळे, गोदामे, पाइपलाइन, आधुनिक कृषी यंत्रसामग्री, मिनी ट्रॅक्टर, ड्रोन तंत्रज्ञान तसेच शेतीमध्ये कृत्रिम बु‌द्धिमत्ता आधारित आधुनिक साधनांचा वापर करण्यासाठी साहाय्य उपलब्ध करून दिले जात आहे. उर्वरित ठिकाणी दिवंगत अजित पवार यांच्या पुढाकाराने कृषी समृद्धी योजना सुरू करण्यात आली आहे. महाराष्ट्रातील अनेक शेतकरी कृषी समृद्धी योजनेचा लाभ घेत आहेत. स्वर्गीय अजित पवार यांनी नेहमीच शेतकरी, ग्रामीण विकास आणि कृषी क्षेत्राच्या प्रगतीला विशेष महत्त्व दिले. त्यांच्या संकल्पनेतून सुरू झालेली ही योजना महाराष्ट्रातील लाखो शेतकऱ्यांसाठी उपयुक्त ठरत आहे. शेतकऱ्यांच्या जीवनात सकारात्मक बदल घडविणाऱ्या या योजनेला त्यांच्या कृषी क्षेत्रातील योगदानाची कायमस्वरूपी ओळख मिळावी, तसेच शेतकरी आणि अजित पवार साहेब यांच्यातील जिव्हाळ्याचे नाते अधोरेखित व्हावे यासाठी'' या योजनेचे नामकरण ‘स्वर्गीय अजितदादा पवार कृषी समृद्धी योजना’ असे करण्यात यावे अशी मागणी करण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Live Updates : आमची लढाई कोणत्याही नेत्याविरोधात नाही, आम्हाला कोणालाही टार्गेट करायचं नाही: विनोद पाटील

Physiotherapy: आता फिजिओथेरपी फक्त उपचारांपर्यंतीच मर्यादित नाही! फिटनेस अन् दीर्घकालीन आरोग्यासाठीही ठरतेय महत्त्वाची

ENG vs PAK: निर्लज्ज कुठला! इंग्लंडकडून लाजीरवाणा पराभव अन् रिझवान दात काढत होता... नेटिझन्सन खळवले; Viral Video

ऑपरेशनसाठी १४ वर्षे प्रतीक्षेत, AIIMSमध्ये नंबर येण्याआधी १६ वर्षीय मुलीचा मृत्यू; वडिलांचा मृतदेह घेण्यास नकार

Managutti Shivaji Maharaj Statue : छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा हटवल्याचे प्रकरण! महत्त्वाचा साक्षीदारच गैरहजर; पोलिस उपनिरीक्षकाविरोधात वॉरंट जारी

SCROLL FOR NEXT