नाशिक

तिघांनी धारदार शस्त्राने केलेल्या हल्ल्यात युवक गंभीर जखमी

CD
12639, 12638 पांडवलेणी: घटनास्थळी पोलिसांनी केलेली नाकेबंदी. दुसऱ्या छायाचित्रात १४ एप्रिल २०२५ च्या बातमीचे कात्रण. जुन्या वादातून तरूणावर हल्ला सकाळ वृत्तसेवा इंदिरानगर, ता.३ : पांडवलेणीच्या पायथ्याशी शौकत फरीद शेख याच्यावर तिघांनी धारधार शस्त्राने केलेल्या हल्ल्यात तो गंभीर जखमी झाला आहे. मागील भांडणाची कुरापत काढून हा हल्ला झाल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार साहिल शेख, अरबाज शेख आणि साहिल सिंग यांनी मागील भांडणाची कुरापत काढून शौकतवर हल्ला केल्याचा संशय आहे. शौकत शेख याच्यावर गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल आहे. १३ एप्रिल २०२५ ला रामदास बोराडे यांच्यावर रात्री १० ला प्राणघातक हल्ला करण्यात आला होता. या हल्ल्यात बोराडे यांचा मृत्यू झाला होता. या प्रकरणात शौकत शेख याला पोलिसांनी अटक केली होती. नुकताच तो कारागृहातून बाहेर आला होता. घटनेची माहिती मिळताच पोलिस उपायुक्त किशोर काळे, सहाय्यक पोलीस आयुक्त डॉ.सचिन बारी, इंदिरानगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनोहर कारंडे यांच्यासह पोलिसांचा फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला. पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी करून तपासाला वेग दिला आहे. -------- गेल्यावर्षीच्या वादातून हल्ला १३ एप्रिल २०२५ ला पांडवलेणी भागात रात्री एका पार्टी दरम्यान कबुतरे दुसऱ्याच्या पेटीत ठेवण्यावरून रामदास बोराडे त्याचा चुलत भाऊ राजेश बोराडे आणि साहिल सिंग यांच्यासोबत शौकत शेखसह, नौशाद हाजी सय्यद, नफीज रफिक शेख, विजय माळेकर, रोहित पालवे, नितीन घुगे आदींचा वाद झाला होता. त्यावेळी शौकतने चिथावणी दिल्यानंतर विजय माळेकरने कंबरेला असलेल्या चाकूने रामदास ला भोसकले होते. या हल्ल्यात त्याचा मृत्यू झाला होता. तर राजेश बोराडे जखमी झाला होता. कदाचित या भांडणाची कुरापत काढूनच हा हल्ला झाला असावा अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manoj Jarange Patil: उद्यापासून हैदराबाद गॅझेटनुसार प्रमाणपत्र वाटप, प्रत्येक जिल्ह्याला नोडल ऑफिसर

माजी भारतीय कर्णधार तारक राऊळ काळाच्या पडद्याआड; कबड्डी जगतावर शोककळा

दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर...

CJPवर गंभीर आरोप करत बनवली नवी पार्टी, CJP-Dची घोषणा; दीपकेच्या घराबाहेर केलेलं आंदोलन

दुचाकीधारकांना दररोज कमाईची संधी, केंद्रीय मंत्री गडकरींनी दिली मोठी माहिती; ड्रायव्हिंग लायसनबाबतही नवा नियम

SCROLL FOR NEXT