नाशिक

शारदा शाळेच्या गोपिकांनी फोडली चेतनानगर ची दहीहंडी

CD
चेतनानागर : सह्याद्री युवक मंडळातर्फे आयोजित दहीहंडी फोडताना शारदा शाळेच्या विद्यार्थिनी (छायाचित्र राजेंद्र बच्छाव) -- शारदा शाळेच्या गोपिकांनी फोडली चेतनानगरची दहीहंडी इंदिरानगर, ता : ६ : गेली २५ वर्षे दहीहंडीची परंपरा जपणाऱ्या चेतनानगर येथील श्रीकृष्ण चॅरिटेबल ट्रस्ट आणि सह्याद्री युवक मंडळातर्फे आयोजित दहीहंडी उत्सवात राणेनगर येथील जाजू विद्यालयाच्या विद्यार्थिनींनी आणि स्थानिक युवकांनी येथील हंडी फोडली. या दहीहंडी उत्सवाला चेतनानगर, इंदिरानगर, राजीवनगर, वासननगरसह सिडकोमधील नागरिकांनी गर्दी केली होती. येथील श्रीकृष्ण मंदिराच्या प्रांगणात हा महोत्सव रंगला. शिवसेनेचे माजी नगरसेवक आणि ट्रस्टचे संस्थापक अमोल जाधव यांनी या उत्सवाच्या आयोजन केले होते. गोविंदा आणि गोपिकांच्या पथकाला रोख ७००१ रुपयांचे बक्षीस आणि गणवेश भेट देण्यात आले. माजी नगरसेविका संगीता जाधव यांनी स्वागत केले. शारदा संस्थेचे विश्वस्त रवींद्र आगळे, मुख्याध्यापक अजय पवार, अनिल गायकवाड ज्योती गायकवाड यांची प्रमुख उपस्थिती होती. मंडळातर्फे मनोज चव्हाण, अजय पाटील, रमेश जगताप, आप्पा बाविस्कर, अरविंद अत्तरदे, नारायण धामणे, योगेश कापडी, शैलेश कार्ले, अमेय जाधव, मानसी जाधव, नीलेश वर्पे आदींनी संयोजन केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी आक्रमक?; देशातील सर्व मत्र्यांचे मागवले वर्क बुक; उद्याच्या बैठकीत होणार झाडाझडती

Dial 112 False Alert : दारूच्या नशेत ‘डायल ११२’ वर खोटी माहिती; पोलिस पोहोचले अन् सापडली अवैध दारू, लोहारा पोलिसांत गुन्हा

Pakistan Cricket : भारताला २०२१ मध्ये पराभूत केले अन् पनवती लागली! पाकिस्तान क्रिकेटच्या 'अधोगती'मागचा अजब तर्क

Marathi News Live Updates : अंतरवाली सराटीत OBC उपोषणासाठी स्टेजला पोलिसांचा नकार

Homemade Anti-Aging Creams: ५०व्या वर्षीही चेहरा दिसेल तरुण! सुरकुत्या आणि बारीक रेषांसाठी घरीच बनवा ‘या’ ८ देसी क्रीम

SCROLL FOR NEXT