फोटो : B12657
वासननगर : राजमुद्रा वेल्फेअर फाउंडेशनच्या दहीहंडीप्रसंगी उपस्थित खानदेशी कलाकार सचिन कुमावत, अभिनेत्री शीतल अहिरराव, कावेरी पाटील, बाळकृष्ण शिरसाट, सुजाता शिरसाट आदी
--
खानदेशी कलाकारांसमवेत
रंगला दहीहंडी उत्सव
इंदिरानगर, ता. ७ : प्रभाग ३१ मधील वासननगर येथील गामणे मैदानावर रविवारी (ता. ६) रात्री खानदेशी कलाकार सचिन कुमावत, अभिनेत्री शीतल अहिरराव आणि कावेरी पाटील यांच्या उपस्थितीत राजमुद्रा वेल्फेअर फाउंडेशनतर्फे आयोजित दहीहंडी उत्सव रंगला. सिडको सभापती बाळकृष्ण शिरसाट यांनी आयोजित केलेल्या उत्सवाला शेकडोंची गर्दी झाल्याने काही काळ येथील मुख्य रस्त्यावरची वाहतूक खोळंबली होती.
भाजप शहराध्यक्ष सुनील केदार, ज्येष्ठ नेते महेश हिरे, गटनेता ॲड. श्याम बडोदे, नगरसेवक भगवान दोंदे, रश्मी हिरे, डॉ. पुष्पा पाटील आदी उपस्थित होते. त्र्यंबकेश्वर येथील आधारतीर्थच्या विद्यार्थिनींनी येथील दहीहंडी फोडली. त्यांना १ लाख रुपये किमतीची इलेक्ट्रिक बाईक बक्षीस म्हणून देण्यात आली. अत्याधुनिक ध्वनियंत्रणा आणि विशेष रोषणाईने उत्सवात रंग भरले. कलाकारांनी केलेल्या सादरीकरण आणि विद्यार्थ्यांच्या नृत्याविष्काराला मोठा प्रतिसाद मिळाला. शहरातील सोशल मीडिया ईन्फ्लुइन्सर, यू- ट्युबर आणि रॅपर्सने प्रेक्षकांचे मनोरंजन केले. राधा- कृष्णाच्या वेशभूषेत आलेल्या शेकडो बालकांना बक्षीसे देण्यात आली. उपस्थित महिलांमधून ११ भाग्यवंतांना पैठणी भेट देण्यात आल्या तर उत्सवासाठी उपस्थित प्रत्येक महिलेलादेखील भेटवस्तू देण्यात आली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.