नाशिक

जेसीबीने पाईपलाईन फोडल्याने लाखो लिटर पाणी वाया

CD
फोटो : B12673 पाथर्डी फाटा: फुटलेली मुख्य पाइपलाइन -- पाइपलाइन फुटल्याने लाखो लिटर पाणी वाया इंदिरानगर : गुरुवारी (ता. १०) सायंकाळी सहाच्या सुमारास पाथर्डी फाटा भागातील हॉटेल रेडिसन ब्लूसमोर ४५० मिमी व्यासाची पाइपलाइन खोदकाम करणाऱ्या जेसीबीने फोडल्याने अर्ध्या तासात लाखो लिटर पाणी वाया गेले. येथे फायबर केबल टाकण्याचे काम सुरू होते. जेसीबीने आनंदनगर पाण्याच्या टाकीला जोडणाऱ्या मुख्य वाहिनीला फटका मारल्याने ही वाहिनी फुटली. १५ ते २० फूट उंच कारंजे उडत होती. सामाजिक कार्यकर्ते चेतन फेगडे यांनी महापालिकेचे मुख्य अभियंता हेमंत पठ्ठे यांना तातडीने ही माहिती कळवली. कर्मचारी नाना गायकवाड, श्री. बोरीचा, श्री. दगडखेर येथे येऊन व्हॉल्व्ह बंद करेपर्यंत लाखो लिटर पाणी वाया गेले होते. वाया गेलेल्या पाण्यामुळे नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. यापूर्वीदेखील ही पाइपलाइन नादुरुस्त झाल्याने मोठ्या प्रमाणात गळती झाल्याचे नागरिकांनी सांगितले. दरम्यान, तातडीने ही पाइपलाइन दुरुस्त करण्याचे काम हाती घेतले आहे. वेळेत काम पूर्ण झाले नाही तर आनंदनगर पाण्याच्या टाकीवरून पाणीपुरवठा होणारा प्रभाग क्रमांक ३१ चा मोठा परिसर प्रभावित होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Missile attack: सौदी अरेबियाच्या संरक्षण मंत्रालयावर बॅलिस्टिक क्षेपणास्त्राने हल्ला; येमेनमधील हूती बंडखोरांचा दावा

Pune News : फटाके विक्रीसाठी जागेच्या लिलावातून ४६ लाखांचे उत्पन्न

‘राजीव गांधी पंतप्रधान व्हावेत, असं मला कधीच वाटलं नाही’; सोनिया गांधी यांचा मोठा खुलासा

Pune Crime : पंचतारांकित हॉटेलमधील हायप्रोफाइल सेक्स रॅकेट उघडकीस; मॉडेलिंग क्षेत्रातील दोन तरुणींची सुटका

CSK COACHING STAFF : IPL २०२७ आधी CSK मध्ये मोठे बदल! अल्बी मॉर्केल, गॅरेथ बॅटींची एन्ट्री; मोहित शर्माकडे गोलंदाजीची जबाबदारी

SCROLL FOR NEXT