नाशिक

पारंपरिक उत्साहात इंदिरानगर मध्ये गणरायाचे स्वागत

CD
पान दोन --------------- मंगलमय वातावरणात गणेशाचे आगमन पावसाच्या सरीं, ढोल-ताशांचा गजरात इंदिरानगर, नाशिक रोडला जल्लोषात आगमन सकाळ वृत्तसेवा इंदिरानगर, नाशिक रोड, ता. १४ : पावसाच्या सरी अंगावर घेत ढोल-ताशा गजरात, पुष्पवृष्टी व गुलालाची उधळण करत इंदिरानगर, नाशिक रोडला लाडक्या गणरायाचे आगमन घरोघरी, मंडळांमध्ये जल्लोषात झाले. इंदिरानगर येतील अजय मित्रमंडळाने किशोरनगर येथून परिसरातील विद्यार्थ्यांना संधी देत यंदा देखील आकर्षक ढोल ,झांज,शंख पथकाचे आणि संबळ चे सादरीकरण केले. मंडळाचे संस्थापक सचिन कुलकर्णी, नगरसेविका डॉ.दीपाली कुलकर्णी, देवानंद बिरारी, धनंजय जोशी, लोटन चौधरी, महादेव जवळकर, नितीन चाळके, आदींच्या उपस्थितीत पालखी काढण्यात आली . इंदिरानगरच्या बापू बंगला चौकातील माजी नगरसेवक सुनील आणि नगरसेविका सुप्रिया खोडे यांच्या इंदिरानगर उत्सव समितीच्या गणरायाची स्थापना करण्यात आली. वडाळा -पाथर्डी रस्त्यावर भाजप गटनेता ॲड. श्याम बडोदे यांच्या श्री प्रतिष्ठान तर्फे छोटेखानी पालखी मिरवणूक काढण्यात आली. मंडळाचे अध्यक्ष जयवंत टक्के, गोपाळ आव्हाड, भरत शिरसाठ, मनीष पाटील , परेश पाटील, उदय बडोदे, अजय बडोदे, योगेश रेवगडे आदींनी संयोजन केले. राणेनगर येथे हिंदू जनसंपर्क कार्यालयातर्फे सागर देशमुख, पूजा देशमुख यांच्या उपस्थितीत स्वराज्य प्रतिष्ठान गणेशाची स्थापना करण्यात आली. नगरसेविका वैशाली दळवी आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे उपमहानगर प्रमुख बंडू दळवी यांच्या उपस्थितीत श्री गुरुधन मित्र मंडळ आणि इच्छापूर्ती गणेश मंडळाच्या गणरायाची दणदणीत आगमन मिरवणूक काढण्यात आली. महेश चव्हाण ,अभिजीत खरोटे, कौस्तुभ दळवी आदींसह श्री गुरुधन मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी संयोजन केले. रथचक्र चौकात स्वा.वि. दा. सावरकर मंडळाच्या ३९ व्या वर्षी माजी सभागृह नेता चंद्रकांत खोडे, सुनील राऊत यांच्या हस्ते गणेशाची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. याच ठिकाणी शिवसेना ठाकरे पक्षाचे मध्य नाशिक विधानसभा समन्वयक संजय गायकर यांच्या युवक मित्र मंडळाच्या गणेशाची जल्लोषात स्थापना करण्यात आली . कलानगर चौकात संघर्ष सेवाभावी संस्थेच्या इंदिरानगरचा मानाचा राजा ची आकाश खोडे आणि गायत्री खोडे यांच्या हस्ते प्रतिष्ठापना करण्यात आली. वासननगर येथे शिवा तेलंग आणि पूजा तेलंग यांचा शंभो नारायण ग्रुपचा २० फूट उंच नाशिकचा विघ्नहर्ता यंदा मुख्य आकर्षण आहे. विनय नगर येथील प्रवीण जाधव यांच्या गर्जना युवा प्रतिष्ठानच्या गणेशाची पारंपरिक उत्साहात स्थापना करण्यात आली. पूर्व विभाग सभापती मंगला नन्नावरे, ॲड. अजिंक्य साने, नगरसेविका रूपाली निकुळे,संध्या कुलकर्णी ,माजी नगरसेवक यशवंत निकुळे यांनी विनय नगर, दीपाली नगर भागात विविध मंडळांच्या स्थापनेला हजेरी लावली. तर सिडको सभापती बाळकृष्ण शिरसाठ, नगरसेवक भगवान दोंदे, माधुरी डेमसे, माजी नगरसेविका पुष्पा आव्हाड, संजय नवले, डॉ. पुष्पा पाटील(नवले) आदींनी गणेशोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या -------------------- नाशिक रोडला घरोघरी स्थापना ‘मंगलमूर्ती मोरया’, ‘आला रे आला गणपती आला’च्या जयघोषात, ढोल-ताशांचा गजर, पारंपरिक वाद्यांचे सूर, पुष्पवृष्टी आणि गुलालाची उधळण करत वरुणराजाच्या साक्षीने श्री गणरायाचे नाशिक रोड परिसरात जल्लोषात आगमन झाले. दिवसभर सुरू असलेल्या रिपरिप पावसाची पर्वा न करता गणेशभक्तांनी लाडक्या बाप्पाचे उत्साहात स्वागत केले. घरोघरी तसेच सार्वजनिक गणेश मंडळांच्या मंडपात विधिवत प्रतिष्ठापना करण्यात आली. गणरायाच्या आगमनाने परिसरातील वातावरण चैतन्यमय झाले आहे. पहाटेपासून पावसाची रिपरिप सुरू असतानाही गणेशमूर्ती खरेदी व घरी नेण्यासाठी भाविकांची लगबग सुरू होती. नाशिक रोड विभागीय कार्यालयात प्रभाग सभापती रमेश धोंगडे यांच्या हस्ते श्री गणेशाची पूजा करण्यात आली. यावेळी बांधकाम उपअभियंता सुरेश पाटील, अधीक्षक कैलास आहिरे यांच्यासह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. घरोघरी गणरायाचे आगमन झाले असतानाच शाळा, महाविद्यालये, शासकीय व खासगी कार्यालये, रुग्णालये, कारखाने, सोसायट्या आणि अपार्टमेंटमध्येही गणेशाची प्रतिष्ठापना करण्यात आली. अनेक ठिकाणी ढोल-ताशांच्या गजरात गणरायाचे स्वागत करण्यात आले. गणेशोत्सवानिमित्त विविध सांस्कृतिक कार्यक्रम, स्पर्धा व सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. प्रसिद्ध अण्णा गणपती नवग्रह सिद्धपीठ येथे चतुर्भुज गणेशाच्या दर्शनासाठी दिवसभर भाविकांची रीघ लागली होती. रिमझिम

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

हिवाळी अधिवेशानात राज्यात लागू होणार समान नागरी कायदा? CM फडणवीसांनी दिली मोठी अपडेट, काय म्हणाले?

Mohol Ganeshotsav : मोहोळ शहरात गणेश मूर्ती खरेदीसाठी मोठी गर्दी, गणेशोत्सवावर दुष्काळाचे सावट गणेश मूर्तीच्या किमती वाढल्या

Marathi News Live Updates : गणरायाच्या आगमनाच्या पहिल्याच दिवशी चंद्रपुरात पोलिसांची कारवाई; डीजेचे साहित्य जप्त

Moon Venus Conjunction Sky Event: चंद्रकोरीसोबत तेजस्वी शुक्राची दुर्मीळ युती; निरभ्र आकाशात नयनरम्य खगोलीय नजारा

Pune News : महापालिकेचे अधिकाऱ्यांना उतरावे लागणार रस्त्यावर; दर शुक्रवारी अहवाल सादर करण्याचे आयुक्तांचे आदेश

SCROLL FOR NEXT