नाशिक

इंदिरानगरला तासाभरात दोन ते तीन लाख लिटर पाणी वाया

CD
फोटो : B12751, B12750 इंदिरानगर : जेसीबीमुळे पाईपलाईन फुटल्याने वाया जाणारे लाखो लिटर पाणी. दुसऱ्या छायाचित्रात या पाण्यात वाहने धुणारे नागरिक -- सणासुदीत लाखोे लिटर पाणी वाया इंदिरानगरचा पुरवठा खंडित; जेसीबीमुळे पाइपलाइन फुटली सकाळ वृत्तसेवा इंदिरानगर, ता. २० : येथील रस्त्याच्या कामादरम्यान जेसीबीने पुन्हा एकदा २०० मिमी व्यासाची पाण्याची पाइपलाइन फोडल्याने तासाभरात दोन ते तीन लाख लिटर पाणी वाया गेले. ऐन सणासुदीच्या काळात होणारी पाण्याची नासाडी बघून नागरिकांनी संताप व्यक्त केला असून संबंधितांकडून याची भरपाई करून घ्यावी अशी मागणी केली आहे. दुपारी दोन ते चार दरम्यान होणारा परबनगर, बजरंग सोसायटी, वृंदावन कॉलनी, गंधर्व नगरी आदी भागातील हजारो नागरिकांचा पाणीपुरवठा विस्कळीत झाला. स्वस्तिक कंपनीतर्फे हे काम सुरू आहे, असे समजते. शनिवारी (ता. १९) खबरदारी म्हणून या ठिकाणी पाइपलाइन दरम्यान प्लेट टाकून पाणीपुरवठा बंद करण्यात आला होता. त्यावेळीदेखील गळती सुरू झाली होती; मात्र ती थांबवण्यात आली होती. रविवारी पुन्हा काम सुरू असताना जेसीबीच्या धक्क्याने ही प्लेट बाजूला झाल्याने हे लाखो लीटर पाणी वाया गेल्याची माहिती कनिष्ठ अभियंता साईश गवळी यांनी दिली. तातडीने या लाइनवरील पाण्याचे व्हॉल्व्ह बंद करण्यात आले. मात्र तोपर्यंत पाण्याची नासाडी झाली होती. राजीवनगर येथील चढ्ढा पार्क येथील पाण्याच्या टाकीतून वितरण करणारी ही वाहिनी होती. दरम्यान, वाया जाणाऱ्या पाण्यात नागरिकांनी आपली वाहने धुवून घेतली. गणेशोत्सवात सर्व प्रकारच्या खोदकामाला मनाई असताना हे काम सुरू कसे असा सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे. दुपारनंतर संबंधित कंपनीतर्फे येथील दुरुस्ती हाती घेण्यात आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Moscow Drone Attack : रशियाची राजधानी हादरली! मॉस्कोवर युक्रेनच्या १००० ड्रोनचा हल्ला, ऑइल रिफायनरीलाही फटका, दोन ठार

Latur DCC Bank : संचालकपदावरून सहकारमंत्रीच बडतर्फ, कारवाई अयोग्य असल्याचा मंत्र्यांचा दावा; RBI विरोधात हायकोर्टात जाणार

Vastu Tips for Kitchen: फ्रिजच्या वर ‘या’ ४ वस्तू ठेवताय? आजच हटवा, होऊ शकतं मोठं नुकसान!

Marathi News Live Updates : मनसे नेते अमित ठाकरे यांनी घेतले दगडूशेठ गणपतीचे दर्शन

PM Kisan Yojana: खुशखबर! 'या' महिन्यात शेतकऱ्यांच्या खात्यात येणार २००० रुपये; किसान योजनेबाबत मोठी अपडेट समोर

SCROLL FOR NEXT