नाशिक

पळसन सुरगाणा

CD
01843 पळसन : नाशिक सापुतारा महामार्गावर खड्डे बुजविताना गुजरातमधील सामाजिक कार्यकर्ते. गुजरातमधील कार्यकत्यांनी बुजविले नाशिक-सापुतारा महामार्गावरील खड्डे सकाळ वृत्तसेवा पळसन, ता. २६ : नाशिक–सापुतारा–वणी महामार्गावरील रस्त्यांची अत्यंत दयनीय अवस्था पुन्हा एकदा समोर आली आहे. या महामार्गावर पडलेल्या मोठमोठ्या जीवघेण्या खड्ड्यांमुळे येथे वारंवार अपघात होत असून अनेक नागरिक गंभीर जखमी झाले आहेत. मात्र, संबंधित प्रशासकीय यंत्रणेकडून याकडे दुर्लक्ष होत राहिले आहे. जे काम महाराष्ट्रातील सार्वजनिक बांधकाम विभागाने करायला हवे होते, ते काम गुजरात राज्यातील सामाजिक कार्यकर्त्यांनी पुढाकार घेत पाच किलोमीटर रस्त्यावरील खड्डे बुजविले. सापुतारा येथील ''नोटिफाईड एरिया''चे पर्यवेक्षक चिमणभाई पवार यांच्या नेतृत्वाखाली पॅराग्लायडिंग व्यवस्थापक मुकेश, मंगेश, विशाल पवार तसेच इतर सहकाऱ्यांनी स्वतःची व्यावसायिक कामे बाजूला ठेवून, महाराष्ट्राच्या हद्दीत येणाऱ्या सापुतारा–ठाणापाडा–हातगड या सुमारे पाच किलोमीटरच्या रस्त्यावरील खड्डे स्वतः श्रमदानातून बुजवले. गुजरातच्या कार्यकर्त्यांच्या या संवेदनशीलतेमुळे अनेक संभाव्य अपघात टळण्यास नक्कीच मदत झाली. राज्यातील सीमेलगतच्या भागात शेजारील राज्यातील कार्यकर्त्यांना येऊन रस्ते दुरुस्त करावे लागणे, ही बाब अत्यंत गंभीर मानली जात आहे. यामुळे महाराष्ट्रातील सार्वजनिक बांधकाम विभाग आणि स्थानिक प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर नागरिकांमधून प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. रस्ते हे विकासाचे प्रतीक मानले जातात; परंतु येथील जीवघेणे खड्डे आणि प्रशासनाची उदासीनता यामुळे निष्पाप नागरिकांचा जीव धोक्यात आला आहे. या लाजिरवाण्या घटनेची मुख्यमंत्र्यांनी तातडीने दखल घ्यावी. नाशिक–सापुतारा–वणी महामार्गावरील सर्व खड्डे युद्धपातळीवर बुजविण्याचे आदेश द्यावेत, तसेच या अक्षम्य निष्काळजीपणासाठी जबाबदार असलेल्या अधिकाऱ्यांची चौकशी करून त्यांच्यावर कडक कारवाई करावी. अशी मागणी नागरिकांनी केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

विजय वडेट्टीवार काँग्रेस सोडणार? उदय सामंत यांच्या विधानावर नेमकं काय म्हणाले? वाचा...

Mumbai: मळमळ होते सांगून टॅक्सी थांबवली; नंतर प्रसिद्ध व्यावसायिकाने सी-लिंकवरून उडी घेतली, कारण काय?

Ram Mandir Trust: राम मंदिर प्रकरणात गुन्हा दाखल झाल्यानंतर मुख्यमंत्री योगींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, श्रद्धेशी खेळणाऱ्यांना...

Lohagad murder case: लोहगडावर मे महिन्यापासून ‘रेकी’, कॉल-मेसेज डिलीट करून पुरावे नष्ट; केतन अग्रवाल खून प्रकरणात नवे धक्कादायक खुलासे

Latest Marathi News Live Update : उद्धव ठाकरे-देवेंद्र फडणवीसांचा एकत्र विमान प्रवास, चर्चांना उधाण....

SCROLL FOR NEXT