PML26B09745
पिंपळगाव बसवंत ः पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर मनाडी नाल्याची सफाईची पाहणी करताना नगराध्यक्ष डाॅ. मनोज बर्डे, सतीश मोरे, नीलेश पाटील आदी.
-----------
पिंपळगावला मनाडी नालासफाईला सुरुवात
पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून उपाययोजना
सकाळ वृत्तसेवा
पिंपळगाव बसवंत, ता.१५ ः गेल्या काही वर्षाचा कटू अनुभव लक्षात घेता पिंपळगाव शहरातील मुख्य बाजारपेठेत पूरस्थिती निर्माण होऊ नये, म्हणून खबरदारीचा उपाययोजना सुरू केल्या आहेत. यंदा तशी परिस्थिती निर्माण होऊ नये म्हणून पिंपळगाव शहरातील बाजारपेठेला शाप ठरलेल्या मनाडी नाल्याच्या साफसफाईला सुरवात केली आहे. यासह लहान मोठ्या नाल्याच्या सफाईला सुरुवात झाली आहे. मे महिन्याअखेरपर्यत नाले स्वच्छतेचे काम पूर्ण करण्याचे नियोजन नगर परिषदेच्या आरोग्य विभागाने केले आहे.
पिंपळगाव बसवंत शहरात सुमारे चार किमी अंतराचा मनाडी नाल्याला सुरुवात होते. छत्रपती संभाजीनगरमार्गे मुख्य बाजारपेठेत हा नाला प्रवाहित होऊन पुढे निफाड रस्त्याच्या डाव्या बाजूने पाराशरी नदीला जाऊन मिळतो. मनाडी नाला पावसाळ्यात दुथडी भरून वाहतो. गेल्या वीस वर्षात या नाल्याच्या पुरामुुळे व्यावसायिकांच्या दुकानात पुराचे पाणी शिरून करोडो रुपयांचे नुकसान झाले आहे. दरवर्षी पावसाळ्यात व्यापाऱ्यांना मनाडीच्या प्रकोपाची भीती असते.
मनाडी नाल्यात प्लास्टीक, भंगार, टाकाऊ साहित्य तसेच कचरा टाकला जातो. गाळ साचल्याने नाले अरूंद व उथळ होतात. त्याचा परिणाम पावसाळ्यात पाणी वाहून नेण्याची नाल्याची क्षमता कमी होते. त्या पाश्वभुमीवर मनाडी नाल्याची स्वच्छता करण्याचे काम नगरपरिषदेने हाती घेतले आहे. ते काम गुणवत्तापूर्ण झाल्यास पूरपरिस्थितीला नागरिकांना तोंड देण्याची गरज पडणार नाही.
नाले सफाईच्या कामाचा प्रारंभ करताना नगराध्यक्ष डाॅ. मनोज बर्डे, उपनगराध्यक्ष सतीश मोरे, गटनेेते नीलेश पाटील, किरण लभडे, सत्यजित मोरे, नगरसेवक प्रशांत मोरे, अल्पेश पारखे, दीपक विधाते, राहुल विधाते, प्रवीण मोरे, संदीप भवर आदी उपस्थित होते.
------------
कोट
पावसाळ्याच्या पाश्वभुमीवर मनाडी नाला सफाईचे काम हाती घेतले आहे. पुराचा धोका टाळण्यासाठी हा प्रयत्न आहे. पूरस्थिती टाळण्यासाठी स्वच्छता विभागाला योग्य सूचना दिल्या आहेत.
- डाॅ. मनोज बरडे, नगराध्यक्ष, नगरपरिषद, पिंपळगाव बसवंत
----------
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.