नाशिक

निफाडमधील ९६ गावांमध्ये ग्रामपंचायत निवडणुकीचे वारे

CD
अँकर --- निफाडमधील ९६ गावांमध्ये ग्रामपंचायत निवडणुकीचे वारे राजकीय हालचाली गतिमान; सोडतीमुळे बदलली पारंपरिक समीकरणे सकाळ वृत्तसेवा पिंपळगाव बसवंत, ता. २४ : निफाड तालुक्यात ९६ गावांमध्ये ग्रामपंचायत निवडणुकीचे वारे वाहू लागले आहे. दोन महिन्यांनी होणाऱ्या ग्रामपंचायत निवडणुकीच्या दृष्टीने राजकीय हालचाली गतिमान झाल्या आहेत. निवडणुकीचा अधिकृत कार्यक्रम जाहीर झालेला नसला तरी इच्छुक उमेदवार आणि राजकीय गटांनी आतापासूनच तयारी सुरू केली आहे. --- सोयीच्या तर कुठे गैरसोयीच्या सोडतीमुळे अनेक गावांतील पारंपरिक राजकीय समीकरणे बदलली आहेत. काही इच्छुकांचे वॉर्ड बदलले असून, काहींच्या आरक्षणात बदल झाल्याने त्यांच्या अडचणी वाढल्या आहेत. परिणामी, संभाव्य उमेदवारांसह राजकीय नेते आणि गावपुढारी गावागावांत सक्रिय झाले आहेत. मतदारांशी संपर्क वाढविणे, कार्यकर्त्यांच्या बैठका घेणे आणि पॅनल उभारणीची चाचपणी सुरू झाली आहे. सध्या विविध राजकीय गटांकडून उमेदवारांची निवड करताना त्यांच्या सामाजिक प्रभावासह आर्थिक स्थिती, गावातील प्रतिष्ठा, भावकी आणि निवडून येण्याची क्षमता यांचा अभ्यास केला जात आहे. अनेक गावांत एकाच गटाची सत्ता दीर्घकाळ राहिल्याने विकासकामांबाबत नाराजी असल्याची चर्चा नागरिकांमध्ये आहे. पाणी, वीज, रस्ते यांसारख्या मूलभूत सुविधांबाबतही अनेक गावांत प्रश्न कायम असल्याचे ग्रामस्थ सांगत आहेत. --- राजकीय कारकिर्दीची संधी ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये तरुणांचा वाढता सहभाग हे यंदाचे वैशिष्ट्य ठरणार आहे. स्थानिक स्वराज्य संस्थामार्फत विकास निधी थेट ग्रामपंचायतीकडे उपलब्ध होत असल्याने अनेक युवक या निवडणुकीकडे राजकीय कारकिर्दीचा श्रीगणेशा करण्याची संधी म्हणून पाहत आहेत. त्यामुळे अनेक ठिकाणी नव्या चेहऱ्यांचे आव्हान विद्यमान पदाधिकाऱ्यांसमोर उभे राहण्याची शक्यता आहे. --- आरोप-प्रत्यारोप सुरू निवडणुकीची चाहूल लागताच गावोगावी विकासकामांचे उद्घाटन, भूमीपूजन, लोकार्पण कार्यक्रमांवरून आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. त्यामुळे आगामी ग्रामपंचायत निवडणुकीत मोठी चुरस निर्माण होणार असल्याचे चित्र तालुक्यात आहे. --- कोणता गट मारणार बाजी निफाड मतदारसंघातील होऊ घातलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत गावागावात आमदार दिलीप बनकर, माजी आमदार अनिल कदम, भाजपाचे जिल्हाध्यक्ष यतीन कदम यांच्या गटातील समर्थकांमध्ये दुरंगी किंवा तिरंगी लढती रंगणार आहेत. यानिमित्ताने गावपातळीवरील राजकारणाला वेग येणार आहे. मुद्द्याची लढाई गुद्द्यावरही जाण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे कोणत्या गावात सत्तांतर घडते, कोणता गट बाजी मारतो याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे. ---

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पासपोर्ट म्हणजे नागरिकत्वाचा पुरावा नाही; MEA कडून महत्त्वाचे स्पष्टीकरण, २७ देशांत भारतीयांना व्हिसा-फ्री प्रवेशाची घोषणा

IND vs ENG, T20I: एकट्या वैभव सूर्यवंशीसाठी इंग्लंडमध्ये वेगळी ड्रेसिंग रुम असणार! पण नेमकं यामागे खरं कारण काय?

Latest Marathi News Live Update : शेती उपसा सिंचन योजनेसाठी वीज कनेक्शन मिळावे, या मागणीसाठी शेतकऱ्यांचे उपोषण

निळावंतीचं रहस्य आणि गुप्त खजिन्याचा शोध! ब्रिटिशकालीन इतिहासावर आधारित 'इंद्रजाल'चा थरारक फर्स्ट लुक आउट

Solapur Water Rights: दुष्काळी १३ तालुक्यांसाठी ३४ वी पाणी संघर्ष परिषद २६ जूनला मंगळवेढ्यात

SCROLL FOR NEXT