नाशिक

ओझर-निफाड-उगांव रस्त्याचे होणार काँक्रिटीकरण

CD
ओझर-निफाड-उगांव रस्त्याचे होणार काँक्रिटीकरण २५६ कोटी मंजूर ः १० मीटर रुंदीकरणामुळे दळणवळण होणार गतीमान सकाळ वृत्तसेवा पिंपळगाव बसवंत, ता. २४ : राज्याच्या पावसाळी अधिवेशनातील पुरवणी अर्थसंकल्पातून निफाड विधानसभा मतदारसंघातील महत्त्वाच्या प्रदेश जिल्हा महामार्गाच्या काँक्रिटीकरणासाठी तब्बल २५६ कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी देण्यात आली आहे. या रस्त्याची रुंदी दहा मीटर असणार असून, यामुळे ग्रामीण भागातील दळणवळण अधिक सक्षम होणार आहे. या निर्णयामुळे शेतकरी, व्यापारी आणि सर्वसामान्य नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. -- मंजूर झालेला हा मार्ग ओझर, कसबे सुकेणे, पिंपळस, कोठुरे ते निफाड, श्रीरामनगर (कोळवाडी), सोनेवाडी बु., थेटाळे आणि उगांव या प्रमुख गावांना जोडणारा आहे. निफाड हे तालुक्याचे गाव व मोठी बाजारपेठ आहे, तर ओझर शहर देखील सर्वात मोठी बाजारपेठ म्हणून ओळखले जाते. तसेच नाशिक विमानतळ व एचएएलमुळे या शहराला जोडणारे रस्ते सुस्थितीत असणे गरजेचे होते. या रस्त्याला जोडणाऱ्या गावातील शेतकरी पिंपळगाव बसवंत कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मुख्य आवारासह ओझर, लासलगाव आणि निफाड उपबाजार आवारात आपला शेतमाल आणतात. या मार्गावरील वाहनांची मोठी संख्या आणि व्यापारी महत्त्व लक्षात घेऊन या मार्गाचे काँक्रिटीकरण व्हावे, यासाठी आमदार दिलीप बनकर यांचा राज्य शासनाकडे सातत्याने पाठपुरावा सुरू होता. --- वाहतूक खर्चात बचत; अपघातांना आळा या रस्त्याचे काँक्रिटीकरण झाल्यानंतर परिसरातील शेतकऱ्यांना आपला शेतमाल थेट बाजारपेठेत नेणे आणि राष्ट्रीय महामार्ग क्रमांक तिनला जोडणे सोपे होणार आहे. यामुळे वाहतूक खर्चात बचत होऊन प्रवासाचा वेळही वाचणार आहे. तसेच या मार्गावरील अपघातांचे प्रमाण कमी होऊन ग्रामीण भागातील उद्योग, व्यापार आणि आर्थिक व्यवहारांना मोठी चालना मिळणार आहे. ------- कोट मतदारसंघात मुख्यमंत्री ग्रामसडक योजना, ‘हॅम’ पॅकेज आणि आशियाई विकास बँक अर्थसहाय्य योजनांमधूनही विविध रस्त्यांची कामे वेगाने सुरू असून, काही कामे पूर्ण झाली आहेत. या भक्कम व दर्जेदार रस्त्यांमुळे शेतकऱ्यांना शेतीमाल थेट बाजारपेठेत नेणे सुलभ होईल आणि नागरिकांच्या दळणवळणाचा प्रश्‍न सुटेल - दिलीप बनकर, आमदार ---

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gen-Zचा जलवा, पहिल्यांदाच ‘वंदे मातरम्’चा जयघोष अन्... यंदा लाल किल्ल्यावर मोठे बदल दिसणार; ८०व्या स्वातंत्र्यदिनी काय खास होणार?

SHRAVAN 2026 : “श्रावणात भोलेनाथांची विशेष कृपा! ‘या’ राशींच्या आयुष्यात होणार मोठा चमत्कार”

कसा झालेला 'अशी ही बनवाबनवी' मधल्या शंतनूचा मृत्यू? पत्नीने सांगितलं त्या दिवशी काय घडलं; आम्ही चौघेही...

Pavitra Portal Deadline Extended: पवित्र पोर्टलवरील प्राधान्यक्रम नोंदणीला मुदतवाढ; तांत्रिक अडचणींमुळे उमेदवारांना दिलासा

शुभमन गिलपेक्षाही मोठी बोली लागलेला कोण आहे Sanvir Singh? T20 स्पर्धेत भारतीय कर्णधारासह खेळणार

SCROLL FOR NEXT