नाशिक

माहे ऑक्टोबर २०२५ मध्ये सततच्या पावसामुळे नुकसान झालेल्या नुकसानग्रस्तांना २५.५३ कोटी मदत जाहीर-आमदार दिलीपराव बनकर

CD
पान-३ साठी--मेन नुकसानीची फोटो वापरणे --------------- अतिवृष्टीग्रस्तांना २५.५३ कोटींची मदत --------------- निफाड तालुक्यातील सात मंडळांसाठी विशेष बाब म्हणून निर्णय ः लवकरच खात्यावर जमा होणार ------------- सकाळ वृत्तसेवा पिंपळगाव बसवंत, ता.१ ः निफाड तालुक्यात गतवर्षी ऑक्टोबरमध्ये झालेल्या सततच्या पावसामुळे शेतीपिकांचे नुकसान झालेल्या तालुक्यातील १७ हजार ४३१ शेतकऱ्यांना विशेष बाब म्हणून सुमारे २५.५३ कोटी मदत जाहीर असल्याची माहिती आमदार दिलीप बनकर यांनी दिली. निफाड तालुक्यात गतवर्षी मे महिन्यापासून पाऊस सुरु झालेला होता. त्यातच खरीप हंगामामध्ये २६ ते २९ ऑक्टोबर या कालावधीत अवेळी पाऊस, ६५ मिलिमीटरपेक्षा कमी पावसामुळे सोयाबीन, मका, भुईमूग, उडीद, मुग, तूर, बाजरी, कांदा, टोमॅटो, ऊस, भाजीपाला तसेच द्राक्ष, डाळिंब, पेरू व इतर फळपिकांचे सततच्या पावसामुळे नुकसान झाले होते. तालुक्यात सर्व अकरा महसूल मंडळांत अतिवृष्टीची नोंद झालेली होती. यापैकी चार महसूल मंडळामध्ये यापूर्वीच नुकसान भरपाई अदा झालेली होती. मात्र उर्वरित पिंपळगाव बसवंत, रानवड, ओझर, पालखेड, निफाड, चांदोरी व देवगाव या ७ महसूल मंडळामध्ये ६५ मिलिमीटरपेक्षा कमी व सततच्या पावसामुळे शेती पिकांप्रमाणेच द्राक्ष आदी फळपिकांचे नुकसान झालेले होते. मात्र त्यांना मदत मिळालेली नव्हती. संबंधित विभागाच्या अहवालानुसार तालुक्यातील बाधित शेतकऱ्यांना भरपाईसाठी आमदार बनकर यांनी सतत पाठपुरावा केला होता. त्यानुसार शासन निर्णयानुसार उर्वरीत ७ महसूल मंडळामधील नुकसान झालेल्या १७४३१ शेतकऱ्यांना सुमारे २५.५३ कोटी मदत जाहीर केलेली आहे. १६-१ केवायसी पडताळणी होणार नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचा डाटा शासनाच्या पोर्टलवर अपलोड केल्यानंतर नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची केवायसी पूर्ण झाल्यावर लवकरच नुकसान भरपाईची रक्कम संबंधित शेतकऱ्यांच्या खात्यास वर्ग होणार आहे. शासनाने एक वेळची विशेष बाब म्हणून मदत जाहीर केल्याबद्दल आमदार बनकर यांनी जनतेतर्फे आभार मानले आहेत. -------------- २०-२ चौकट या निकषांमुळे मिळाली मदत सातही महसूल मंडळामध्ये ६५ मिलिमीटरपेक्षा कमी व सततच्या पावसामुळे शेती पिकांप्रमाणेच द्राक्षाचे मोठे नुकसान झाले होते. तालुक्यात सरासरीपेक्षा १५८.९६ टक्के जास्त पाऊस झालेला असल्याने द्राक्षबागेत पाणी साठवून द्राक्षपिकांच्या मुळांची कुज होऊन व इतर विविध कारणांमुळे द्राक्षबागेची फळधारणा होऊ शकली नाही. त्यामुळे द्राक्ष पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होऊन बहुसंख्य द्राक्ष उत्पादक शेतकरी अडचणीत आले होते. आमदार बनकर यांनी शासनाकडे सतत पाठपुरावा केल्याने तालुक्यातील नुकसानीची सद्यःस्थिती जाणून घेत वस्तुस्थितीदर्शक अहवाल सादर झाल्याने भरपाई मंजूर करण्यात आली. ------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Palghar News: श्वानाच्या पिल्लाला बिबट्याचे अभय, बावड्या गावातील घटना सीसीटीव्हीत कैद

अमित ठाकरेंविरोधात BJP आक्रमक, माहीममध्ये भाजप-मनसे कार्यकर्ते आमनेसामने, पोलिसांनी मनसे कार्यकर्त्यांना घेतलं ताब्यात

Mamata Banerjee Relative Death : ममता बॅनर्जींच्या नातेवाईक महिलेचा संशयास्पद मृत्यू; पतीसोबत सुरू होता घटस्फोटाचा खटला

१०२ पेक्षा जास्त ताप तरीही निवेदिता सराफ यांनी केलं 'कृष्णाईच्या लेकी'चं शूटिंग; अभिनेत्याच्या हातालाही होती सलाइन

Maharashtra Cabinet Decisions : मंत्रिमंडळ बैठकीवर तुकाराम मुंढेंचा प्रभाव चार महत्त्वाचे निर्णय; एकनाथ शिंदे यांची अनुपस्थिती

SCROLL FOR NEXT