नाशिक

रानभाज्या आरोग्यदायी जीवनाचा ठेवा-उपाध्यक्ष विश्वास मोरे

CD
PML26B10081 पिंपळगाव बसवंत ः वाघ महाविद्यालयात ‘रानभाज्या महोत्सव व कृषी उत्पादने प्रदर्शन उद्घाटनप्रसंगी उपाध्यक्ष विश्वास मोरे, प्रा. रवींद्र मोरे, प्राचार्य डॉ. व्ही. बी. कदम, उपप्राचार्य प्रा. दिलीप माळोदे आदी. -------------- रानभाज्या आरोग्यदायी जीवनाचा ठेवा विश्वास मोरे ः वाघ महाविद्यालयात रानभाज्या महोत्सव व कृषी उत्पादने प्रदर्शन सकाळ वृत्तसेवा पिंपळगाव बसवंत, ता.३ ः रानभाज्या हा आपल्या पारंपरिक आहार संस्कृतीचा समृद्ध ठेवा असून त्या विविध पोषक घटकांनी, जीवनसत्त्वांनी आणि खनिजांनी समृद्ध आहेत. अनेक रानभाज्यांना औषधी गुणधर्मही लाभलेले आहेत. आरोग्यदायी जीवनासाठी रानभाज्यांचे जतन, संवर्धन आणि सेवन ही काळाची गरज आहे, असे प्रतिपादन मविप्र उपाध्यक्ष विश्वास मोरे यांनी केले. पिंपळगाव बसवंत वाघ महाविद्यालयात वनस्पतीशास्त्र विभाग आणि अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षातर्फे आयोजित ‘रानभाज्या महोत्सव व कृषी उत्पादने प्रदर्शनाप्रसंगी ते बोलत होते. स्थानिक व्यवस्थापन समिती अध्यक्ष प्रा. रवींद्र मोरे, प्राचार्य डॉ. व्ही. बी. कदम, उपप्राचार्य प्रा. दिलीप माळोदे, सकाळ सत्र प्रमुख डॉ. ज्ञानेश्वर सातभाई, प्रा. बी. एन. कडलग, विभागप्रमुख डॉ. सुलभा लालसरे, समन्वयक डॉ. सचिन जाधव, डॉ. अतुल मदने, डॉ. राहुल गायखे, प्रा. मेघा रायते, संपत खैरनार उपस्थित होते. प्रा. मोरे यांनी रानभाज्यांचे आहारातील महत्त्व स्पष्ट करताना पारंपरिक रानभाज्या आणि संकरित (हायब्रीड) भाजीपाला यातील फरक विद्यार्थ्यांना सोप्या पद्धतीने समजावून सांगितला. प्राचार्य डॉ. कदम यांनी रानभाज्यांचे आरोग्याच्या दृष्टीने असलेले महत्त्व समजावून सांगितले. डॉ. सुलभा लालसरे यांनी प्रास्ताविक केले. डॉ. अनिल तिदार, डॉ. दीपा कुचेकर, प्रा. मनीषा सोनवणे, प्रा. प्रियंका निकम, प्रा. राहुल गायखे, प्रा. मेघा रायते आणि प्रा. गायत्री वीर यांनी परीक्षण केले. प्रा. शिवानी गवळी यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. सचिन जाधव यांनी आभार मानले. डॉ. अतुल मदने, डॉ. राहुल गायखे, प्रा. मेघा रायते, विजय मात्सगर, प्रवीण पवार, भारत आहेर, धनंजय वाघ प्रयत्न केले. --------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

लेकीची मुख्यमंत्र्यांवर आक्षेपार्ह टीका, नेत्याला मंत्रिपद गमावण्याची वेळ

Curtly Ambrose : त्याने विकेट घेतली की आई घराबाहेर घंटा वाजवायची! २१ व्या वर्षी क्रिकेटला सुरुवात केलेला तो जगातील महान गोलंदाज बनला

टिटवाळ्यातील कामामुळे आंबिवलीत प्रवासी रखडले, स्टेशन मास्टर कार्यालयात प्रवाशांनी घातला गोंधळ

Life Horoscope: दीर्घायुष्य लाभलेल्या असतात ‘या’ राशीच्या व्यक्ती; आयुष्यात कितीही त्रास आला तरी लढण्याची ताकद कायम, तुमची रास कोणती?

Egg Freezing & Future Fertility: आई-वडिल होण्यासाठी अंडी फ्रीज करण्याचा विचार करताय? आधी ‘या’ ४ गोष्टी समजून घ्या

SCROLL FOR NEXT