नाशिक

अंधारात बिबट्याची दहशत, उंबरखेड-चिंचखेडचे रात्रीचे लोडशेडिंग बंद करा

CD
पान तीन ---------------- 10085 पिंपळगाव बसवंत : उंबरखेड-चिंचखेडचे रात्रीचे लोडशेडिंग बंद करण्याच्या मागणीचे निवेदन देताना जयराम शिंदे, शिवानंद संधान आदी. उंबरखेड-चिंचखेड परिसरात बिबट्याचा महिलेवर हल्ला सकाळ वृत्तसेवा पिंपळगाव बसवंत, ता. ४ : उंबरखेड व चिंचखेड परिसरात गुरुवारी (३ सप्टेंबर) रात्री एका महिलेवर बिबट्याने हल्ला केल्याची घटना घडली असून, या हल्ल्यात महिलेच्या पायाला दुखापत झाली आहे. गेल्या काही वर्षांपासून बिबट्याच्या हल्ल्यांच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मागील तीन ते चार दिवसांपासून रात्री ७ ते ९ वाजेच्या दरम्यान वीजपुरवठा खंडित होत असल्याने बिबट्याच्या हल्ल्याचा धोका अधिक वाढत असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. रात्रीच्या वेळी वीजपुरवठा बंद असल्याने परिसरात अंधाराचे साम्राज्य निर्माण होते. नागरिकांना शेतात तसेच घराबाहेर ये-जा करताना मोठ्या धोक्याचा सामना करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर चिंचखेड व उंबरखेड ग्रामस्थांच्या वतीने पिंपळगाव येथील वीज वितरण कार्यालयातील अभियंता महादेव मुंडे यांना निवेदन देण्यात आले. नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने रात्रीच्या वेळचे लोडशेडिंग तात्काळ बंद करून अखंडित वीजपुरवठा करावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली. यावेळी चिंचखेडचे उपसरपंच शिवानंद संधान, उंबरखेडचे जयराम शिंदे यांच्यासह मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मुंबईतील सर्वात श्रीमंत बाप्पा! GSB सेवा मंडळाच्या गणपतीला ७०३ कोटी रुपयांचे विमा संरक्षण

Pune Festival : पुणे फेस्टिव्हलचे १८ सप्टेंबरला उपराष्ट्रपतींच्या हस्ते उद्घाटन

Pune News : संच मान्यतेचे प्रचलित निकष कायम ठेवण्याच्या मागणीसाठी पुण्यात शिक्षकांचा मोर्चा

Marathi News Live Updates : वाद, चर्चा थांबवा, उत्सवाकडे लक्ष केंद्रित करा, गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांच्या एकमेकांना सूचना

Tejas Express: तेजसच्या प्रवासात मोदकांचा गोडवा! गणेशोत्सवात भाविकांसाठी आयआरसीटीसीची खास मेजवानी

SCROLL FOR NEXT