नाशिक

शतकमहोत्सवाकडे वाटचाल करणार्या पिंपळगांव सोसायटीच्या अध्यक्षपदाचा मान पहिल्यांदाच महिलेला

CD
पान-३ PML26B10105 पिंपळगाव बसवंत ः येथील सोसायटीच्या अध्यक्षपदी शोभा बनकर व उपाध्यक्षपदी सोमनाथ मोरे यांची निवड झाल्याबद्दल सत्कार करताना भास्कर बनकर, तानाजी बनकर, दिलीप मोरे, चंद्रकांत खोडे आदी. ---------------------- पिंपळगाव सोसायटीच्या अध्यक्षपदी प्रथमच महिला शोभा बनकरांना संधी ः उपाध्यक्षपदी सोमनाथ मोरेही बिनविरोध, शतकमहोत्सवाकडे वाटचाल सकाळ वृत्तसेवा पिंपळगाव बसवंत, ता.१० ः शतकमहोत्सवाकडे वाटचाल करणाऱ्या पिंपळगाव बसवंत विविध कार्यकारी सोसायटीच्या अध्यक्षपदाचा मान पहिल्यादाच महिलेला मिळाला आहे. शोभा दौलतराव बनकर यांना अध्यक्षपदाची संधी मिळाली आहे. उपाध्यक्षपदी सोमनाथ मोरे यांची वर्णी लागली आहे. चंद्रकांत बनकर व हिराबाई खोडे यांनी अध्यक्ष व उपाध्यक्षपदाचा राजीनामा दिल्याने निवडणूक निर्णय अधिकारी कांतिलाल गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. त्यात दोन्ही पदासाठी प्रत्येकी एकेक अर्ज दाखल झाल्याने बिनविरोध निवडीची घोषणा करण्यात आली. सुमारे वीस कोटी रुपये वार्षिक कर्ज वाटप व जिल्ह्यात अव्वल असलेल्या पिंपळगाव सोसायटीत शोभा बनकर यांच्या कुटुंबाला तिसऱ्यांदा मानाचे पान मिळाले आहे. यापूर्वी त्यांचे पती (स्व) दौलतराव बनकर व सासरे पंढरीनाथ बनकर यांनी अध्यक्षपदाची धुरा सांभाळली आहे. ज्येष्ठ नेते भास्कर बनकर, तानाजी बनकर, दिलीप मोरे, चंद्रकांत खोडे, गणेश बनकर, संचालक चंद्रकांत बनकर, हिराबाई खोडे, सुरेश खोडे, राहुल बनकर, रामराव डेरे, अनिल बनकर, विजय देशमाने, दत्तात्रेय देवकर, आशिष बागूल, अशोक भवर, मोतीराम पवार, हर्षल जाधव, अशोक विधाते, केशव बनकर, कौस्तुभ तळेकर, राजेंद्र विधाते, विकास बनकर, रामराव बनकर, इकबाल शेख, बाळा बनकर, संतोष बनकर, विशाल मोरे, साहेबराव जाधव, बाळासाहेब विधाते, पुंडलिक बनकर, सचिव नितीन कर्डेल आदी उपस्थित होते. --------- कोट पती व सासरे यांच्यानंतर मला अध्यक्षपदाचा मान मिळाला आहे. शेतीत राबणाऱ्या महिलांचा हा सन्मान आहे. सर्वांना सोबत घेऊन संस्थेच्या प्रगतीचा आलेख उंचावत ठेवणार आहे. - शोभा बनकर, नवनिर्वाचित अध्यक्ष, पिंपळगाव सोसायटी. -----------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Rain: ३ दिवस धो-धो कोसळणार! पावसाबद्दल मोठी अपडेट, राज्यातील 'या' जिल्ह्यांना अलर्ट

Xi Jinping India Visit: शी जिनपिंग यांचा भारत दौरा निश्चित! पंतप्रधान मोदी यांचं निमंत्रण स्वीकारलं, सात वर्षांनंतर देशात येणार

IND vs AFG : भारत-अफगाणिस्तान पहिल्या सामन्यावर संकट! दिल्ली पोलिसांचे पत्र अन् उडाली खळबळ; नेमकं काय घडलं?

Sillod News : पोळ्याच्या दिवशी काळाचा घाला; भराडीच्या १५ वर्षीय विद्यार्थ्याचा तळ्यात बुडून मृत्यू

Marathi News Live Updates : माधुरी हत्तीण वनतारातून नांदणीच्या दिशेने रवाना; मनोज पाटील यांची माहिती

SCROLL FOR NEXT