नाशिक

पिंपळगाव पोलिसांचा गणेशोत्सवासाठी तगडा बंदोबस्त १५ रेकॉर्डवरील गुन्हेगार हद्दपार; ४६ जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई

CD
फोटो-10113 पिंपळगाव बसवंत ः गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर रविवारी निघालेला रूट मार्च. पिंपळगावला गणेशोत्सवासाठी चोख बंदोबस्त १५ गुन्हेगार हद्दपार; ४६ जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई सकाळ वृत्तसेवा पिंपळगाव बसवंत, ता. १३ ः गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पिंपळगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीत कायदा सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलिसांनी कडक सुरक्षा व्यवस्था केली आहे. १५ गुन्हेगारांना हद्दपार करण्यात आले असून, ४६ जणांविरुद्ध कारवाई करण्यात आली आहे. गणेशोत्सवात कोणत्याही प्रकारे शांतता भंग करणाऱ्यांवर कारवाईचा इशारा पोलिसांनी दिला आहे. गणेशोत्सव शांततेत साजरा करण्याचे आवाहन पोलिसांनी गणेश मंडळे, कार्यकर्ते व नागरिकांना केले आहे. विशेषतः डीजे व ध्वनिप्रदूषणाबाबत मंडळांनी दक्षता घ्यावी. आवाजाची मर्यादा व वेळेच्या निर्बंधांचे काटेकोर पालन करावे. तसेच ज्येष्ठ नागरिक, लहान मुले, विद्यार्थी व रुग्णांना त्रास होणार नाही याची काळजी घ्यावी, असे पोलिसांनी स्पष्ट केले. गणेशोत्सवासाठी नऊ पोलिस अधिकारी, १२० पोलीस अमलदार, विशेष पथक, होमगार्ड, पोलिस कर्मचारी व स्वयंसेवक असा बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे. संवेदनशील ठिकाणांवर विशेष लक्ष ठेवण्यात येणार आहे. विसर्जनाच्या ठिकाणी संबंधित नगरपंचायत, महावितरण व इतर यंत्रणांच्या समन्वयाने बॅरिकेडिंग, प्रकाश व्यवस्था, बोट, प्रशिक्षित पोहणारे, आपत्ती व्यवस्थापन पथक तसेच आवश्यक पोलिस तैनात करण्यात येणार आहे. नागरिकांनी नदी, तलाव व जलाशयाच्या ठिकाणी सुरक्षिततेचे नियम पाळावेत, लहान मुलांची काळजी घ्यावी, असे आवाहन या वेळी करण्यात आले. .......... कोट कोणत्याही समाजाच्या भावना दुखावतील असे घोषवाक्य, पोस्ट, स्टेटस अथवा सोशल मीडिया संदेश प्रसारित करू नये. गणेशोत्सव जल्लोषात साजरा करूया; मात्र कायद्याच्या चौकटीत आणि सामाजिक सलोखा राखून साजरा करूया- गणेश गुरव, पोलिस निरीक्षक, पिंपळगांव बसवंत ----

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Social Media Election Rules : निवडणूक प्रचारात डीपफेक व्हिडिओ वापराल तर कारवाई; आयोगाचे राजकीय पक्षांना कडक निर्देश

'मी जे केलं ते तुम्ही करू नका...' सिंगल मदरहुडबद्दल नीना गुप्तांचं स्पष्ट वक्तव्य, म्हणाल्या...

Chanakya Niti: नशीब बदलत नाही म्हणून निराश आहात? चाणक्य नीतीतील ‘या’ २ सवयी आजपासून अंगीकारा!

हरतालिकेची पूजा का करतात? एका क्लिकमध्ये वाचा व्रताचे महत्त्व!

Marathi News Live Updates : एनडीए "१७ सप्टेंबर ते १७ ऑक्टोबर या कालावधीत देशभरात 'सेवा संकल्प' अभियान' राबवणार : अमित शहा

SCROLL FOR NEXT