नाशिक

कादवा तीरावर गणेश विसर्जनासाठी पिंपळगाव नगरपरिषदेचे चोख नियोजन,

CD
PML26B10173 पिंपळगाव बसवंत ः कादवा तिरावरील विसर्जनाच्या तयारीचा आढावा घेताना नगराध्यक्ष डाॅ. मनोज बर्डे, उपनगराध्यक्ष सतीश मोरे, नीलेश पाटील व पोलिस प्रशासन ----------------- पिंपळगावला विसर्जनासाठी चोख नियोजन बॅरिकेडिंग, तराफे, निर्माल्य संकलनासह स्वतंत्र मार्गव्यवस्था; कृत्रिम तलाव वापरण्याचे आवाहन सकाळ वृत्तसेवा पिंपळगाव बसवंत, ता.२१ ः गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मूर्ती विसर्जनासाठी पिंपळगाव बसवंत नगरपरिषदेने कादवा नदी तीरावर चोख नियोजन केले आहे. बांबूच्या तराफ्याने कादवा पात्रात मूर्ती विसर्जनाची व्यवस्था केली जाणार आहे. विसर्जनाच्या दिवशी भाविकांची गर्दी लक्षात घेता सुरक्षितता, वाहतूक नियंत्रण आणि स्वच्छतेला प्राधान्य देत विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. विसर्जन व्यवस्थेची नगराध्यक्ष डॉ. मनोज बर्डे, उपनगराध्यक्ष सतीश मोरे, शिवसेना गटनेते नीलेश पाटील यांच्यासह नगरपरिषद व अग्निशामक विभागाच्या कर्मचाऱ्यांनी पाहणी केली. विसर्जनस्थळी भाविकांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्याच्या सूचना उपनगराध्यक्ष मोरे यांनी कर्मचाऱ्यांना दिल्या. यंदाही तराफ्यांची व्यवस्था करण्यात येणार आहे. मोठ्या मूर्तीसाठी क्रेनची व्यवस्था असेल. मूर्तीदान करणाऱ्या भाविकांचा नगरपरिषदेतर्फे सत्कार करण्यात येणार आहे. विसर्जनस्थळी संपूर्ण परिसरात बॅरिकेडिंग करण्यात येणार असून निर्माल्य संकलनासाठी स्वतंत्र व्यवस्था राहणार आहे. गणेशमूर्ती घेऊन येणाऱ्या भाविकांसाठी स्वतंत्र मार्ग, तर विसर्जनानंतर परत जाण्यासाठी स्वतंत्र मार्ग ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे विसर्जनाच्या दिवशी एकेरी वाहतूक व्यवस्था प्रभावीपणे राबविण्यात येणार आहे. नगरपरिषदेतर्फे शहरात चार ठिकाणी कृत्रिम तलावांची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांनी कादवा नदी तीरावर अनावश्यक गर्दी न करता शक्यतो कृत्रिम तलावांमध्ये मूर्तींचे विसर्जन करावे असे आवाहन नगरपरिषद प्रशासनाने केले आहे. ----

Tata Chairman Salary: Tata Sons च्या चेअरमनला किती पगार मिळतो? नोएल टाटांच्या विरोधानंतर पद पुन्हा चर्चेत; आकडा पाहून धक्का बसेल!

Akola News : जिल्हाधिकाऱ्यांनी सोडले शेतकऱ्यांना वाऱ्यावर; महाबीज प्रशासनाकडून माहिती देण्यास नकार, एमडींनीही केले हात वर

Ai+ Nova 2 Power 5G भारतात लाँच! 16,999 रुपयांत खरेदीची संधी...पाहा फीचर्स अन् ऑफर्स!

Katraj Kondhwa Road Issue : आयुक्तांचे आश्वासन विरणार हवेत! कात्रज कोंढवा रस्ता; उर्वरित १० मिळकतींमुळे रस्ता रुंदीकरण रखडणार

Farmer Agitation : शेतकरी संकटात, सरकार कुठंय? लोहाऱ्यात हजारो शेतकऱ्यांचा आक्रोश; आमदारांना बोलण्यास मनाई करत शेतकऱ्यांनी सोयाबीन उधळले

SCROLL FOR NEXT