नाशिक

टोमॅटो खरेदी-विक्री व्यवहारात पारदर्शकता ठेवण्याची सभापती बनकर यांची अडतदारव्यापार्यांना सूचना

CD
पान-१ PML26B10135 पिंपळगाव बसवंत ः बाजार समितीत व्यापारी- अडतदारांच्या बैठकीत बोलताना सभापती आमदार दिलीप बनकर, समवेत नारायण पोटे आदी. --------------- टोमॅटो खरेदी-विक्रीत पारदर्शकता ठेवा सभापती बनकर यांची अडतदार व्यापाऱ्यांना सूचना, दररोज दीड लाख कॅरेटची आवक सकाळ वृत्तसेवा पिंपळगाव बसवंत, ता.१८ ः टोमॅटोचा हंगाम सुरू झाल्याने सध्या येथील बाजार समितीत बंपर आवक होत आहे. दररोज सुमारे दीड लाख कॅरेट दाखल होत आहेत. त्यामुळे अडतदार व्यापाऱ्यांनी खरेदी-विक्रीत पारदर्शकता ठेवावी, जेणेकरून वाद उद्ङवणार नाहीत अशा सूचना सभापती, आमदार दिलीप बनकर यांनी दिल्या. -------------- मोठी आवक होत असल्याने बाजार समिती प्रशासनासमोर खरेदी-विक्री व्यवहार सुरळीत ठेवण्याचे मोठे आव्हान आहे. या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांच्या तक्रारी तसेच खरेदी-विक्री प्रक्रियेत निर्माण होणारे वाद लक्षात घेऊन सभापती बनकर यांनी अडते व व्यापाऱ्यांची बैठक घेतली. विक्री प्रक्रियेत कोणताही गैरसमज अथवा आर्थिक तफावत निर्माण होऊ नये, यासाठी बैठकीत महत्त्वपूर्ण सूचना देण्यात आल्या. बाजार समितीच्या सभागृहात झालेल्या बैठकीस संचालक नारायण पोटे, नंदू गागुर्डे, अडतदार- व्यापारी सुभाष होळकर, सोमनाथ निमसे, सन्मान गायकवाड, सुधीर गवळी, राजेंद्र साळवे, मिनाज शेख आदी उपस्थित होते. --------------- बाजार समितीच्या मुख्य प्रवेशद्वारावर टोमॅटोची खरेदी करू नये, तर लिलावासाठी निश्चित केलेल्या जागेवरच खरेदी-विक्रीचे व्यवहार करावेत, अशा सूचना देण्यात आल्या. टोमॅटो खरेदीची पावती देणे बंधनकारक करण्यात आले आहे. खरेदी पावतीवरील दर आणि टोमॅटो खाली करताना आकारला जाणारा दर यामध्ये कोणतीही तफावत राहता कामा नये, ज्या दराने टोमॅटोची खरेदी करण्यात आली आहे, त्याच दराने तो माल खाली करण्यात यावा, अशा स्पष्ट सूचना व्यापारी व अडत्यांना देण्यात आल्या. निर्यात होणारा टोमॅटो आणि स्थानिक बाजारासाठी असलेल्या टोमॅटोच्या लिलावासाठी स्वतंत्र लाईन करण्यात येणार आहे. त्यामुळे लिलाव प्रक्रिया अधिक शिस्तबद्ध आणि सुरळीत होण्यास मदत होणार आहे. शेतकरी व व्यापारी यांच्यात गैरसमज अथवा वाद निर्माण होऊ नयेत, यासाठी व्यवहारात स्पष्टता आणि पारदर्शकता ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे. शेतकऱ्यांनी मोठ्या कष्टाने पिकविलेल्या टोमॅटोला योग्य पद्धतीने बाजारपेठ उपलब्ध करून देणे आणि त्यांच्या हक्काचे संरक्षण करणे ही बाजार समितीची जबाबदारी आहे. ----- कोट शेतकऱ्यांच्या तक्रारींची दखल घेऊन खरेदी-विक्री व्यवहार अधिक पारदर्शक व शिस्तबद्ध करण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्यात येत आहेत. शेतकरी आणि व्यापारी यांच्यात कोणताही गैरसमज किंवा वाद निर्माण होऊ नये, यासाठी सर्वांनी बाजार समितीच्या नियमांचे पालन करावे. - दिलीप बनकर, सभापती, पिंपळगाव बाजार समिती. -----------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde Dare Village : गावी आलो किंवा लंडनला गेलो तरी पोटदुखी, “ विरोधकांना कामातून उत्तर देईन”,एकनाथ शिंदेंनी दरेतून साधला निशाणा

रोहित शर्माचा Mumbai Indians मधील 'सहकारी' Ajit Agarkar ची जागा घेणार; आता हिटमॅन २०२७ चा वर्ल्ड कप खेळणारच...

सगळं सोडून द्यायचा विचार होता पण...; सुटकेनंतर संतोष पंडित काय म्हणाले? तुरुंगातल्या व्यवस्थेवरही प्रश्नचिन्ह

Marathi News Live Updates : UPI व्यवहारांवर शुल्क, व्यापाऱ्यांकडून QR कोड हटवण्याची भूमिका

Panvel News: पनवेलमध्ये वाहतुकीत मोठे बदल! गणरायाच्या विसर्जन मिरवणुकांसाठी प्रशासनाचे कडक पाऊल

SCROLL FOR NEXT