नाशिक

देहेरे गावातील दारूबंदी साठी सरसावल्या रणरागिणी

CD
फोटो ः01806 पेठ ः पोलिस ठाण्यात निवेदन देताना रोशनी अलबाड, राही अलबाड यांच्यासह देहेरे गावातील महिला. -- महिलांची पेठ पोलिस ठाण्यावर धडक अवैध दारू विक्री बंद करण्याची मागणी; अधिकाऱ्यांना निवेदन सकाळ वृत्तसेवा पेठ, ता. २४ : दिंडोरी तालुक्यातील देहेरे गावात अवैध देशी दारू विक्रेत्यांनी उच्छाद मांडला असून, वाढत्या व्यसनाधीनतेमुळे महिला त्रस्त झाल्या आहेत. या बेकायदेशीर व्यवसायाचा तातडीने बंदोबस्त करावा, या मागणीसाठी गावातील सत्तरपेक्षा अधिक महिलांनी थेट पेठ पोलिस ठाण्यावर धडक दिली. देहेरे गावातील महिलांनी यापूर्वी अनेकदा अवैध दारू विक्री बंद करण्यासाठी निवेदने दिली; मात्र पोलिसांकडून थातूरमातूर कारवाई केली जात असल्याने हा धंदा पुन्हा सुरू होतो. यामुळे गावातील तरुण पिढी नशेच्या आहारी गेली असून, अनेक संसार उद्ध्वस्त झाले आहेत. दारू विक्रेत्यांना जाब विचारण्यास गेलेल्या महिलांना धमक्या दिल्या जात असल्याचेही समोर आले आहे. अखेर संतप्त महिलांनी पोलिस निरीक्षक केदार व उपविभागीय पोलीस अधिकारी देवरे यांची भेट घेऊन त्यांना मागण्यांचे निवेदन दिले. गावात तत्काळ दारूविक्री बंद न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा महिलांनी दिला आहे. निवेदनावर रोशनी अलबाड, राही अलबाड, योगिता पडेरे, मनीषा हाडस, हिरामण घोरपडे यांच्यासह महिलांच्या स्वाक्षऱ्या आहेत. --

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lohagad Murder Case: ''प्रतिष्ठेसाठी सियाने केतनला ठार मारण्याचा प्लॅन केला'', पोलिस चौकशीत चेतनचा धक्कादायक दावा

Rishabh Pant: 'भाई, कन्फर्म! मी परत येतोय...' DC सोबतच्या ट्रेडनंतर रिषभचा फोन अक्षर पटेलने आधी उचलाच नव्हता अन् मग...

Government Recruitment: मोठी बातमी! आरोग्य विभागात लवकरच पदभरती; पदनिर्मितीचा जीआर निघाला, राज्यात एवढ्या जागा रिक्त

Pune City Yellow Alert : पुणे शहराला ‘यलो’ तर घाटमाथ्याला ‘ऑरेंज’ अलर्ट; पुढील तीन दिवसात पावसाचा जोर वाढणार

Latest Marathi News Live Update: राष्ट्रीय राजधानीच्या अनेक भागांत जोरदार पाऊस

SCROLL FOR NEXT