नाशिक

खाजगी आश्रमशाळेचा ऐतिहासिक विक्रम ; १५ माजी विद्यार्थ्यांची प्राथमिक शिक्षकपदी निवड, निरगुडे गावातील ८ जणांचा समावेश

CD
पान-२ ॲंकर PTH26B01871 निरगुडे ः येथील आश्रमशाळेत भावी शिक्षकांचा सत्कार करताना संस्थाध्यक्ष खंबाईत, पदाधिकारी तसेच मुख्याध्यापक, शिक्षक व ग्रामस्थ ---------------- निरगुडेच्या खासगी आश्रमशाळेचा शैक्षणिक विक्रम ------------ पंधरा माजी विद्यार्थ्यांची एकाचवेळी प्राथमिक शिक्षकपदी निवड, गावातील तब्बल आठ जण, शाळेतर्फे सत्कार ------------ सकाळ वृत्तसेवा पेठ, ता.३१ : पेठ तालुक्यातील ग्राम विकास मंडळ निरगुडे संचलित अनुदानित आश्रमशाळेने शैक्षणिक क्षेत्रात अभूतपूर्व यश संपादन केले आहे. ''पवित्र पोर्टल''द्वारे जाहीर झालेल्या प्राथमिक शिक्षक भरतीच्या निकालात या आश्रमशाळेतील तब्बल १५ माजी विद्यार्थ्यांची शिक्षक पदावर निवड झाली आहे. एकाच शाळेतून १५ विद्यार्थ्यांची निवड होणे ही संपूर्ण तालुक्यासाठी अत्यंत अभिमानास्पद बाब ठरली आहे. ---------- अतिदुर्गम निरगुडे गावातील​ ६० वर्षांच्या शैक्षणिक परंपरेवर शिक्कामोर्तब करताना दर्जेदार शिक्षण आणि सामाजिक संस्कारांची गौरवशाली परंपरा जपणाऱ्या निरगुडे आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांनी आजवर विविध क्षेत्रांत यश संपादन केले आहे. या मोठ्या यशाने शाळेच्या शैक्षणिक गुणवत्तेवर आणि शिस्तबद्ध अध्यापनावर पुन्हा एकदा मोहर उमटवली आहे. निवड झालेल्या १५ विद्यार्थ्यांपैकी ८ विद्यार्थी हे एकट्या निरगुडे गावातील आहेत. यामध्ये पल्लवी संजय भुसारे, योगिता नामदेव जाधव, हर्षदा सुनील खांबाईत, सागर दिलीप खंबाईत, नंदिनी हरिचंद्र जाधव, शिवानी भगवान खांबाईत, नीलिमा संजय भुसारे आणि हर्षदा मनोहर गायकवाड या गुणवंत विद्यार्थ्यांचा समावेश आहे. एकाच गावातील ८ विद्यार्थ्यांनी सरकारी शिक्षक पदावर स्थान मिळवून रोजगाराची संधी हस्तगत केल्याने गावात आनंदाचे वातावरण आहे. शाळेच्या संस्कारातून घडलेले हे शिक्षक आता नव्या पिढीला घडवून समाजाचे चित्र बदलतील, असा विश्वास उपस्थितांनी व्यक्त केला. या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष दादासाहेब खंबाईत यांच्या हस्ते यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. मुख्याध्यापक, संस्थेचे पदाधिकारी, शिक्षक, ग्रामस्थ आणि पालकांनी उपस्थित राहून सर्व नवनिर्वाचित शिक्षकांवर अभिनंदनाचा वर्षाव केला. --------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

दिल्ली-महाराष्ट्रात कोट्यवधी मतदारांची नावं वगळली; SIR ड्राफ्टमध्ये तुमचं नाव आहे का? कसं चेक करायचं?

Horoscope: जन्माष्टमीच्या दिवशी ग्रहांची खास स्थिती; ‘या’ ४ राशींचं नशीब अचानक चमकणार? पैसा, करिअरमध्ये प्रगतीसह मोठ्या धनलाभाचे संकेत

जंतर-मंतर CJP आंदोलनातील विद्यार्थ्यांवरील FIR मागे घेण्यासाठी सरकारची सुप्रीम कोर्टात धाव; काय आहे अनुच्छेद 142?

Marathi News Live Updates : भारतातील बोगदा बचाव पथकाची नेपाळी लष्करासोबत भागीदारी

‘निपुण’ भारतीय नौदलाच्या ताफ्यात दाखल! खोल समुद्रातील मोहिमा करणार, पाणबुडी बचाव क्षमतेला बळ; पाहा वैशिष्ट्ये

SCROLL FOR NEXT