पान दोन
-----------------
01894
पेठ : फणसपाडा येथील शाळेला शैक्षणिक साहित्य प्रदान करताना भरसट दांपत्य.
जिल्हाधिकारी डॉ. योगेश भरसट
यांच्याकडून फणसपाडा शाळेला डिजिटल साहित्य
सकाळ वृत्तसेवा
पेठ, ता. ९ : प्रतिकूल परिस्थितीतून मार्ग काढत आणि बालपणी आदिवासी भागातील शाळेची पहिली पायरी चढत यशाचे शिखर सर करणारे, सध्या मध्य प्रदेशातील झाबुआ जिल्ह्याचे जिल्हाधिकारी म्हणून कार्यरत असलेले फणसपाडा (ता. पेठ) येथील सुपुत्र डॉ. योगेश तुकाराम भरसट यांनी आपल्या जन्मभूमीप्रति आणि प्राथमिक शाळेप्रति कृतज्ञता व्यक्त करत एक आदर्श पायंडा पाडला आहे. शिक्षक दिनाचे औचित्य साधून त्यांनी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, फणसपाडा येथील विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेसाठी तब्बल १ लाख ६० हजार रुपये किमतीचे अत्याधुनिक शैक्षणिक साहित्य भेट दिले आहे.
डिजिटल शिक्षणाची कास धरत आदिवासी भागातील विद्यार्थ्यांना प्रगत तंत्रज्ञानाची ओळख व्हावी, यासाठी डॉ. योगेश भरसट यांनी शाळेला ६५ इंच इंटरॲक्टिव्ह फ्लॅट पॅनल (स्मार्ट बोर्ड), ५५ इंच स्मार्ट टीव्ही, शुद्ध व थंड पाण्यासाठी वॉटर फिल्टर आणि दोन उच्च दर्जाचे स्टॅबिलायझर भेट दिले. हे शैक्षणिक साहित्य डॉ. योगेश भरसट यांचे वडील तुकाराम मल्हारी भरसट व आई काशीबाई तुकाराम भरसट यांच्या हस्ते शाळेला सुपूर्द करण्यात आले. आपल्या मातीतील लेकाने जिल्हाधिकारी पदापर्यंत मजल मारून गावच्या शाळेला लावलेला हा हातभार संपूर्ण पेठ तालुक्यात कौतुकाचा विषय ठरला आहे.
या प्रसंगी सरपंच मीराबाई भास्कर वाघेरे, विजय भरसट, संचालक दिलीप भुसारे, दिलीप डगळे, भास्कर भुसारे, निवृत्ती वाघमारे, शांताराम चौधरी, रमेश पवार, पंडित बाम्हणे, अंबादास वाघेरे, विष्णू मानभाव, युवराज गाढवे, संजय चौधरी, हर्षद चौधरी, मनोहर भरसट, मीराबाई गवळी यांच्यासह मुख्याध्यापक तुषार चौधरी, देविदास कोतवाल, तानाजी महाले उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.